अहमदाबाद, 1 मे : पंजाब किंग्जचा (PBKS) ऑफ स्पिनर हरप्रीत बरार (Harpreet Brar) याच्यासाठी शुक्रवारची रात्र स्वप्नवत होती. यापूर्वीच्या दोन आयपीएल सिझनमध्ये हरप्रीतला एकही विकेट मिळाली नव्हती. त्यानं शुक्रवारी फक्त 7 बॉलमध्ये विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि एबी डीव्हिलियर्स (Ab de villiers) या तिघांना आऊट केलं.
हरप्रीतनं विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलला बोल्ड केलं. हे दोघं आऊट झाल्यानंतर पंजाबसाठी डीव्हिलियर्सची विकेट महत्त्वाची होती. हरप्रीतनं 13 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला हा अडथळा दूर केला. मॅचनंतर हरप्रीतनं डीव्हिलियर्सला आऊट करण्यासाठी केलेल्या योजनेचा खुलासा केला.
"डीव्हिलियर्सला मोठे शॉट्स मारण्यापासून अडवणे ही माझी योजना होती. त्यामुळे मी त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकण्याचं ठरवलं. याच कारणामुळे मी स्लिपमध्ये फिल्डर उभा केला होता. सुदैवानं डीव्हिलियर्सचा तो बॉल खेळला आणि मला त्याची विकेट मिळाली. अचूक टप्प्यावर बॉलिंग करण्याची माझी योजना होती." असं बरारनं सांगितलं.
बॅटींगमध्येही केली कमाल
हरप्रीत या सिझनमध्ये पहिल्यांदाच खेळत होता. तो सातव्या क्रमांकावर बॅटींगला आला तेंव्हा पंजाबची अवस्था 5 आऊट 118 होती. त्यानं कॅप्टन के.एल. राहुलसोबत नाबाद 61 रनची पार्टरनरशिप केली. यामध्ये हरप्रीतनं फक्त 17 बॉलमध्ये नाबाद 1 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं नाबाद 25 रन काढले.
विराटनं नवख्या बॉलरला दिली शाबासकी ज्यानं त्याचीच विकेट काढली, पाहा VIDEO
कोण आहे हरप्रीत?
पंजाबमधील मोगा हे हरप्रीतचे गाव आहे. त्याला 2019 साली पंजाब किंग्जनं सर्वप्रथम करारबद्ध खेळला. तो त्या सिझनमध्ये फक्त 2 मॅच खेळला. त्यानंतर मागील सिझनमध्ये (IPL 2020) तर त्याला फक्त 1 मॅच खेळायला मिळाली. या आयपीएलमध्येही त्याची पहिलीच मॅच आहे. यापूर्वीच्या 3 आयपीएल मॅचमध्ये हरप्रीतला एकही विकेट मिळाली नव्हती. दोन वर्षानंतर त्याची आयपीएलमध्ये विकेट घेण्याची क्षमता संपली आणि त्यानं पहिल्याच मॅचमध्ये आयपीएलमधील तीन मोठ्या बॅट्समन्सना आऊट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Punjab kings, RCB