मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: राजस्थानच्या खेळाडूच्या आजोबांचे कोरोनामुळे निधन, 'त्यानं' घेतला मोठा निर्णय

IPL 2021: राजस्थानच्या खेळाडूच्या आजोबांचे कोरोनामुळे निधन, 'त्यानं' घेतला मोठा निर्णय

चंदीगड टीमचा कॅप्टन आणि राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) बॅट्समन मनन व्होरा (Manan Vohra) याच्यासाठी मागचा आठवडा अतिशय त्रासदायक होता.

चंदीगड टीमचा कॅप्टन आणि राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) बॅट्समन मनन व्होरा (Manan Vohra) याच्यासाठी मागचा आठवडा अतिशय त्रासदायक होता.

चंदीगड टीमचा कॅप्टन आणि राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) बॅट्समन मनन व्होरा (Manan Vohra) याच्यासाठी मागचा आठवडा अतिशय त्रासदायक होता.

नवी दिल्ली, 1 मे : चंदीगड टीमचा कॅप्टन आणि राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) बॅट्समन मनन व्होरा (Manan Vohra) याच्यासाठी मागचा आठवडा अतिशय त्रासदायक होता. त्याचे आई-वडिल आणि आजोबा हे पंचकुलामधील हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होते. या सर्वांना कोरोनाची लागण झाली होती.  व्होराचे आई-वडिल कोरोनामधून बरे झाले आणि ते घरी परतले. पण दुर्दैवानं आजोबांना ही लढाई जिंकता आली नाही. त्यांचं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते.

माजी हॉकीपटू होते आजोबा

मनन व्होराच्या आजोबांचं नाव यशपाल व्होरा (Yashpal Vohra) होतं. ते राष्ट्रीय हॉकीपटू होते. बलबिर सिंग (सिनियर), धरम सिंग, बक्षीस सिंग या सारख्या ज्येष्ठ हॉकीपटूंसोबत त्यांनी 1950 च्या दशकात भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केलं. मेलबर्नमध्ये 1956 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांची भारताच्या संभाव्य खेळाडूंमध्ये निवड झाली होती. मात्र दुखापतीमुळे त्यांची ती संधी हुकली. ते चंदीगड हॉकी आणि चंदीगड ऑलिम्पिक असोसिएशनचे 25 वर्ष प्रशासक होते.

आजोबांच्या निधनाचे वृत्त समजताच मननं दिल्लीहून तातडीनं चंदीगडला परतण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मी त्याला आयपीएल सोडून न येता टीमसोबतच राहण्यास सांगितले. त्यानं आयपीएल स्पर्धा पूर्ण खेळावी अशीच त्याच्या आजोबांची इच्छा होती, अशी माहिती मननचे वडील संजीव व्होरा  'हिंदुस्थान टाईम्स' शी बोलताना दिली. सध्याच्या परिस्थितीमुळे टीम सोडून परत आल्यावर पुन्हा टीममध्ये सहभागी होणे हे अवघड आहे,'' असं त्यांनी सांगितलं.

आर. अश्विनच्या घरातील 10 जणांना कोरोनाची लागण!

मननची कारकीर्द

मनन व्होरा हा 2012 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकलेल्या टीमचा सदस्य आहे. त्यानं आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज (PBKS), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या टीमचं प्रतिनिधित्व केलं असून तो सध्या राजस्थान रॉयल्सचा सदस्य आहे. व्होरानं 53 आयपीएल मॅचमध्ये 130.60 च्या स्ट्राईक रेटनं 1054 रन काढले आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

First published:
top videos

    Tags: Covid-19, IPL 2021, Rajasthan Royals