मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : Time Out ठरतोय RCB साठी लकी, विराटच्या गेम प्लानमुळे विरोधी टीमचा खेळ खल्लास!

IPL 2021 : Time Out ठरतोय RCB साठी लकी, विराटच्या गेम प्लानमुळे विरोधी टीमचा खेळ खल्लास!

आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) विराट कोहलीची (Virat Kohli) आरसीबी (RCB) चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या मोसमात आरसीबीने 10 पैकी 6 मॅच जिंकल्या तर 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. 12 पॉईंट्ससह विराटची टीम पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पुढे वाचा ...

दुबई, 29 सप्टेंबर : आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) विराट कोहलीची (Virat Kohli) आरसीबी (RCB) चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या मोसमात आरसीबीने 10 पैकी 6 मॅच जिंकल्या तर 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. 12 पॉईंट्ससह विराटची टीम पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये (RCB vs RR) विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, पण एव्हिन लुईस (Evin Lewis) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यांनी राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. लुईसने 37 बॉलमध्ये 58 रन आणि जयस्वालने 22 बॉलमध्ये 31 रन केले. या दोघांमध्ये 8.2 ओव्हरमध्येच 77 रनची पार्टनरशीप झाली.

लुईस आणि जयस्वाल यांच्या पार्टनरशीपनंतर मात्र राजस्थानची बॅटिंग गडगडली. दुसऱ्या टाईम आऊटनंतर बँगलोरने संजू सॅमसन (Sanju Samson) आणि राहुल तेवतिया (Rahul Tewatia) यांची विकेट घेतली. शाहबाज अहमदने (Shahbaz Ahmed) या दोन्ही खेळाडूंना आऊट केलं. संजू सॅमसन 19 रनवर आणि राहुल तेवतिया 2 रनवर माघारी परतले.

टीम इंडियातील धुसफुस चव्हाट्यावर; या दोघांनी BCCI कडे केली विराटची तक्रार!

आयपीएलच्या या मोसमात दुसऱ्या टाईम आऊटनंतरचा खेळ आरसीबीसाठी लकी ठरत आहे. मागच्या तिन्ही मॅचमध्ये दुसऱ्या टाईम आऊटनंतर आरसीबीला मोठ्या विकेट मिळाल्या. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात बँगलोरने अंबाती रायुडूची, मुंबईविरुद्ध सूर्यकुमार यादवची आणि राजस्थानविरुद्ध संजू सॅमसन आणि तेवतियाची विकेट दुसऱ्या टाईम आऊटनंतरच मिळवली. यातल्या चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये बँगलोरचा पराभव झाला, तर मुंबईविरुद्धची मॅच जिंकण्यात त्यांना यश आलं. मुंबईविरुद्ध फास्ट बॉलर हर्षल पटेलने (Harshal Patel) हॅट्रिक घेतली होती.

विराटनंतर T20 World Cup साठी आपणच कर्णधार; रोहित शर्माने दिले संकेत

आयपीएल इतिहासामध्ये आरसीबीला एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. या आयपीएलनंतर आपण आरसीबीचा कर्णधार राहणार नाही, असं विराटने आधीच स्पष्ट केलं आहे, त्यामुळे विराटचा शेवट गोड करण्याचा बँगलोरच्या टीमचा प्रयत्न असेल.

रोहितला Team India चा कर्णधार करावं, हे दोघे उपकर्णधार; दिग्गज क्रिकेटपट्टूने दिली या नावांना पसंती

First published:
top videos

    Tags: IPL 2021, RCB, Virat kohli