Home /News /sport /

IPL 2021 : जडेजानंतर मांजरेकरांच्या निशाण्यावर धोनी, माहीचा फॉर्म पाहून चाहत्यांनाच दिला सल्ला

IPL 2021 : जडेजानंतर मांजरेकरांच्या निशाण्यावर धोनी, माहीचा फॉर्म पाहून चाहत्यांनाच दिला सल्ला

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manrekar) हे नेहमीच आपल्या रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. जडेजानंतर आता त्यांच्या निशाण्यावर चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 3 ऑक्टोबर : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manrekar) हे नेहमीच आपल्या रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. मांजरेकरांच्या या भूमिकेमुळे ते अनेकवेळा वादातही सापडतात. याआधीही रविंद्र जडेजाबाबत (Ravindra Jadeja) दिलेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे मांजरेकरांवर बरीच टीका झाली होती. एवढच नाही तर खुद्द रविंद्र जडेजानेही त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. जडेजानंतर आता त्यांच्या निशाण्यावर चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आला आहे. चेन्नईच्या समर्थकांनी धोनी फॉर्ममध्ये परत यायची अपेक्षा करणं योग्य नाही, असं वक्तव्य मांजरेकर यांनी केलं आहे. हैदराबादविरुद्धच्या (SRH vs CSK) सामन्यात धोनीने सिक्स मारत टीमला विजय मिळवून दिला. चेन्नईसाठी सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या धोनीने आयपीएलच्या या मोसमात निराशाजनक कामगिरी केली आहे. 8 इनिंगमध्ये त्याला 13.2 च्या सरासरीने फक्त 66 रन करता आले आहेत. हैदराबादविरुद्ध त्याने नाबाद 14 रनची खेळी केली. सिक्स मारून धोनीने सामना फिनिश केला, यानंतर चाहत्यांना धोनी पुन्हा एकदा जुन्या रुपात दिसेल, असं वाटत आहे. IPL 2021: 'माझा अजूनही त्याच्यावर विश्वास नाही,' मांजरेकरनं पुन्हा साधला जडेजावर निशाणा इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना मांजरेकर म्हणाले, 'हो आपण हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनीने सिक्स मारल्यानंतर रोमँटिक झालो आणि आठवणींमध्ये रमलो. पण आतापर्यंत धोनीच्या बॅटमधून काही खास बघायला मिळालं नाही. जुना धोनी बॅटने पुनरागमन करेल, अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही. तसंच धोनीचा खराब बॅटिंग फॉर्म चेन्नईचं काहीही नुकसान करत नाहीये. इतर खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. धोनी बॅटने फॉर्ममध्ये नसला तरी तो कॅप्टन्सीमध्ये फॉर्म दाखवत आहे.' धोनीला मोठा धक्का, Play off पूर्वी भरवशाचा खेळाडू जखमी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला असला तरी धोनीने या मॅचमध्ये स्वत:च्या नावावर नवा विक्रम केला. चेन्नईसाठी धोनी 200 व्यांदा कॅप्टन म्हणून मैदानात उतरला. यातल्या 119 सामन्यांमध्ये त्याने चेन्नईला जिंकवलं, तर 80 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. 'आयपीएलमध्ये 60 टक्के मॅच जिंकणं हा एक शानदार रेकॉर्ड आहे. हे रेकॉर्ड तुटेल असं मला वाटत नाही. मागच्या वर्षी पॉईंट्स टेबलमध्ये खाली राहिल्यानंतर त्याने टीममध्ये बदल केले, जे मोठं काम होतं. धोनीकडे खेळाडूंचा सेट तयार असायचा, पण यावेळी त्याने टीममध्ये बदल केले आणि योग्य संयोजनासह तो खेळला,' असं म्हणत मांजरेकरांनी धोनीच्या रणनितीचं कौतुक केलं. आयपीएल संपल्यानंतर धोनी पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये येणार आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी धोनीची टीम इंडियाचा मेंटर म्हणून निवड करण्यात आली आहे. 24 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर धोनीला जाणवली 'या' दोघांची कमतरता, म्हणाला...
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni

    पुढील बातम्या