Home /News /sport /

IPL 2021: महेंद्रसिंह धोनीला मोठा धक्का, Play off पूर्वी भरवशाचा खेळाडू जखमी

IPL 2021: महेंद्रसिंह धोनीला मोठा धक्का, Play off पूर्वी भरवशाचा खेळाडू जखमी

महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) ही टीम 18 पॉईंट्ससह सध्या टॉपवर आहे. आता स्पर्धेच्या निर्णयाक टप्प्यात चेन्नईचा भरवशाचा खेळाडू जखमी झाल्यानं कॅप्टन धोनीची काळजी वाढली आहे.

    मुंबई, 3 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या हाफमध्ये (IPL 2021, Phase 2) सलग 5 मॅच जिंकून चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला आहे. महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) ही टीम 18 पॉईंट्ससह सध्या टॉपवर आहे. आता स्पर्धेच्या निर्णयाक  टप्प्यात चेन्नईचा भरवशाचा खेळाडू जखमी झाल्यानं कॅप्टन धोनीची काळजी वाढली आहे. चेन्नईचा महत्त्वाचा बॅटर फाफ ड्यू प्लेसिसच्या (Faf Du Plessis Concussion) कन्कशनच्या समस्येनं पुन्हा डोकं वर काढलं आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध शनिवारी झालेल्या मॅचमध्ये रन काढताना त्याला ही दुखापत झाली. ड्यू प्लेसिस फास्ट बॉलर मुस्तफिजूर रहमानला  (Mustafizur Rahman)  धडकला होता. त्यानंतर काही वेळ तो मैदानात बसला होता. चेन्नईच्या इनिंगमधील  सहाव्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. मुस्तफिजूर ही ओव्हर टाकत होता. त्याच्या ओव्हरच्या पाचव्या बॉलला एक रन काढण्याच्या प्रयत्नात ड्यू प्लेसी त्याला धडकला. त्यानंतर तातडीनं चेन्नईचे फिजियो मैदानात आले आणि त्यानं ड्यू प्लेसीवर उपचार केले. या प्रकाराचा ड्यू प्लेसीच्या एकग्रतेवरही परिणाम झाला तो पुढच्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. यापूर्वीही झाला होता जखमी ड्यू प्लेसिसला कन्कशनचा त्रास होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी पाकिस्तान सुपर लीग (PSL 2021) स्पर्धेतही तो दुखापतग्रस्त झाला होता. क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळताना तो फिल्डिंगच्या दरम्यान सहकारी खेळाडू मोहम्मद हसनैनला धडकला होता. त्यानंतर तातडीनं त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेमण्यात आलं. यानंतर त्यानं पीएसएल स्पर्धेतून माघार घेतली. तसंच 'द हंड्रेड' स्पर्धेतही खेळला नाही. IPL 2021: राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर धोनीला जाणवली 'या' दोघांची कमतरता, म्हणाला... ड्यू प्लेसिस या आयपीएलमध्ये चांगल्याच फॉर्मात आहे. त्यानं 12 मॅचमध्ये 46 च्या सरासरीनं 460 रन काढले आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. तसंच त्यानं 43 फोर आणि 18 सिक्स देखील लगावले आहेत. त्याची ही दुखापत फार गंभीर असू नये अशीच प्रार्थना चेन्नईचे फॅन करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, IPL 2021

    पुढील बातम्या