मुंबई, 3 ऑक्टोबर : चेन्नई सुपर किंग्सच्या विजयी घौडदौडीला राजस्थान रॉयल्सनं (RR vs CSK) ब्रेक लावला आहे. शनिवारी झालेल्या मॅचमध्ये राजस्थाननं चेन्नईचा 7 विकेट्सनं पराभव केला. चेन्नईनं पहिल्यांदा बॅटींग करताना राजस्थानसमोर 190 रनचं टार्गेट ठेवलं होतं. राजस्थाननं हे आव्हान आरामात पार केलं. राजस्थानकडून शिवम दुबे (Shivam Dubey) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) या दोघांनी आक्रमक अर्धशतक झळकावले. या पराभवानंतर धोनीनं टीमला दोन दिग्गजांची कमतरता जाणवल्याचं कबुल केलं. राजस्थान विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये दीपक चहर (Deepak Chahar) आणि ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) या दोघांचा प्लेईंग 11 मध्ये समावेश नव्हता. चेन्नईचे या सिझनमधील हे दोन यशस्वी बॉलर आहेत. त्यांच्या जागी सॅम करन आणि के. असिफ यांचा चेन्नईनं समावेश केला होता. ‘टीमला चहर आणि ब्राव्होची कमतरता जाणवली. हे दोघंही अनुभवी आहेत. मला त्यांची आठवण आली. राजस्थान रॉयल्सनी चांगली बॅटींग केली. मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना ‘पॉवर प्ले’ मध्ये चांगली सुरुवात करणे आवश्यक असते. त्यांनी त्यामध्ये आक्रमक सुरुवात केली. त्यामुळे आमच्या हातामधून मॅच निसटली. आम्हाला हा पराभव विसरायला हवा. तसंच चुकांमधून धडा घेणे आवश्यक आहे.’ असं धोनीनं सांगितलं.
Sensational run-chase to seal a win! 👌 👌@rajasthanroyals put up a solid show with the bat & beat #CSK by 7⃣ wickets. 👏👏 #VIVOIPL #RRvCSK
— IndianPremierLeague (@IPL) October 2, 2021
Scorecard 👉 https://t.co/dRp6k449yy pic.twitter.com/fbv8zN02Aw
राजस्थानचा विजय, मुंबईला फटका राजस्थानच्या या विजयामुळे मुंबईसाठी प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग आणखी बिकट झाला आहे. मुंबईची टीम सध्या सातव्या क्रमांकावर आहे. 12 मॅचमध्ये मुंबईने 5 मॅच जिंकल्या, तर 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. कोलकाता, पंजाब, राजस्थान आणि मुंबई या चारही टीमनी तेवढ्याच मॅच खेळल्या असून त्यांचे पॉईंट्सही समान आहेत. पण नेट रनरेटमुळे कोलकाता चौथ्या, पंजाब पाचव्या, राजस्थान सहाव्या आणि मुंबई सातव्या क्रमांकावर आहे. ऋतुराजनं शतकापूर्वीच सुरू केले सेलिब्रेशन, सर्वांना झाली नीरज चोप्राची आठवण! पाहा VIDEO चेन्नई आणि दिल्लीची टीम आधीच प्ले-ऑफमध्ये पोहोचली आहे. तर सनरायझर्स हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर रोहित शर्मा निराश! सांगितलं, टीमच्या अपयशाचं मुख्य कारण