मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: 'माझा अजूनही त्याच्यावर विश्वास नाही,' मांजरेकरनं पुन्हा साधला जडेजावर निशाणा

IPL 2021: 'माझा अजूनही त्याच्यावर विश्वास नाही,' मांजरेकरनं पुन्हा साधला जडेजावर निशाणा

रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध (KKR) त्यानं नुकतीच 8 बॉलमध्ये 22 रनची विजयी खेळी केली होती. या खेळीनंतरही माझा त्याच्यावर विश्वास नाही, असं वक्तव्य माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यानं केलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 1 ऑक्टोबर : चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) ऑल राऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध (KKR) त्यानं नुकतीच 8 बॉलमध्ये 22 रनची विजयी खेळी केली होती. तसंच त्यानं बॉलिंग आणि फिल्डिंगच्या माध्यमातूनही चेन्नईच्या विजयात योगदान दिले आहे. या कामगिरीनंतरही संजय मांजेरकरनं (Sanjay Manjrekar) जडेजावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मांजरेकर हा जडेजावर टीका करण्यासाठी कायम चर्चेत असतो. 2019 च्या वर्ल्ड कप दरम्यानही त्यानं जडेजावर बिट्स अँड पिस' क्रिकेटपटू म्हणून टिका केली होती. 'मला आजही त्याच्या बॅटींगवर विश्वास नाही.' असं वक्तव्य मांजेरकरनं केलं आहे. 'क्रिकइन्फो'या क्रिकेट वेबसाईटवरील कार्यक्रमात तो बोलत होता. विशेष म्हणजे जडेजानं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळलेल्या आक्रमक इनिंगनंतर मांजेकरनं हे वक्तव्य केलं आहे. मांजरेकर यावेळी म्हणाला की, 'मला अजूनही जडेजाच्या बॅटींगची खात्री नाही. विशेषत: चेन्नईनं त्याला  एक रोल दिला आहे. जडेजाला प्रत्येक मॅचमध्ये समान भूमिका मिळाली तर तो चांगल्या बॉलरच्या विरुद्धही अशीच कामगिरी करेल का? कारण त्यानं आत्तापर्यंत प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षल पटेल सारख्या बॉलर्सविरुद्ध फटकेबाजी करुन रन केले आहेत. तो अन्य फास्ट बॉलर्सच्या विरुद्धही इतक्याच आक्रमकतेनं रन काढतो का? हे पाहावं लागेल.' IPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं शब्द पाळला! हैदराबादवरील विजयानंतर म्हणाला... मांजेरकरनं यावेळी पुढे सांगितलं की, ' जडेजानं मागच्या दोन मॅचमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यानं त्याच्या ओव्हर्सचा कोटा पूर्ण केला आहे. त्यानं कोटा पूर्ण केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) सुटकेचा निश्वास सोडतो. जडेजानं त्याच्या बॉलिंगचा कोटा नियमितपणे पूर्ण केला तर त्याचं टीमसाठी महत्त्व आणखी वाढेल.' POINTS TABLE: या आयपीएल स्पर्धेत जडेजा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यानं आत्तापर्यंत 11 मॅचमध्ये 146 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं 179 रन काढले आहेत. त्यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे. तसंच त्यानं 6.66 च्या इकॉनमी रेटनं 8 विकेट्स घेतल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, Ravindra jadeja

    पुढील बातम्या