IPL 2021: आणखी एक सामना होणार रद्द? कोरोनामुळे राजस्थान रॉयल्सविरोधात खेळण्यास CSK तयार नाही- रिपोर्ट

IPL 2021: आणखी एक सामना होणार रद्द? कोरोनामुळे राजस्थान रॉयल्सविरोधात खेळण्यास CSK तयार  नाही- रिपोर्ट

यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेवर (IPL 2021) कोरोनाचं सावट वाढू लागलं आहे. एकामागोमाग एक धक्कादायक बातम्या आयपीएलच्या मैदानातून समोर येत आहेत. आता चेन्नई सुपर किंग्ज VS राजस्थान रॉयल्स हा सामनाही कोरोनामुळे रद्द होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मे: यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेवर (IPL 2021) कोरोनाचं सावट वाढू लागलं आहे. एकामागोमाग एक धक्कादायक बातम्या आयपीएलच्या मैदानातून समोर येत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) यांच्या टीममधले सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सोमवारी सीएसकेचे 2 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांची राजस्थान रॉयल्सविरोधातील (Rajasthan Royals) सामना खेळण्याची तयारी नसल्याचं चेन्नई सुपरकिंग्जने बीसीसीआयला (BCCI) कळवल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स असा सामना होणार आहे, त्यावर आता कोरोनाचं सावट दिसतं आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत माहिती दिली आहे.

चेन्नईचे बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी (Laxmipati Balaji) आणि टीमचे सीईओ एस विश्वनाथन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मीडिया अहवलानुसार, या दोघांच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आल्यास मैदानात उतरू अशी भूमिका चेन्नईने घेत बीसीसीआयला त्यासंदर्भात कळवले आहे. आयपीएलच्या एसओपीनुसार सहा दिवसात तीन चाचण्या घेतल्या जातात. त्यामुळे त्यानंतरच चैन्नई मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

(हे वाचा-IPL 2021 : आयपीएलवर संकट, CSK-KKR नंतर आणखी एक टीम आयसोलेट)

BCCI च्या SOP नुसार एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास संबंधित व्यक्तींची पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी केली जाते. मीडिया अहवालात सीएसकेच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने असं नमुद करण्यात आले की, त्यांनी पुढील सामना (राजस्थान रॉयल्स विरोधातील) खेळण्यास नकार दिला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'बीसीसीआयला चाचण्यांच्या प्रोटोकॉल बद्दल माहित आणि किती चाचण्या निगेटिव्ह येणं आवश्यक आहे हे देखील माहित आहे. त्यामुळे आम्ही BCCI शी बोललो आहोत. त्यांना हा सामना रिशेड्यूल करावा लागेल.' या सहा दिवसांच्या कालावधीतल चेन्नईचा आणखी एक सामना असणार आहे, जो सनरायजर्स हैदराबाद विरोधात असेल.

(हे वाचा-IPL 2021 : आता मुंबई इंडियन्सच्या सामन्यावरही संकट, समोर आलं धक्कादायक कारण)

दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सचे वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandip Warrior) हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यानंतर कोलकाता आणि बँगलोर (KKR vs RCB) यांच्यातली सोमवारी होणारी मॅच स्थगित करण्यात आली होती. दरम्यान CSK vs RR हा सामनाही स्थगित केल्यास आयपीएलच्या या हंगामात स्थगित झालेली ही दुसरी मॅच असेल. दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा मागचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला, या सामन्यात वरुण चक्रवर्ती कोलकात्याच्या टीममध्ये होता, त्यामुळे तो दिल्ली कॅपिटल्सच्या संपर्कात आला होता, म्हणून दिल्लीची टीम देखील आयसोलेट झाली आहे. बीसीसीआयनेच (BCCI) दिल्ली कॅपिटल्सला आयसोलेट व्हायला सांगितल्याचं वृत्त आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: May 4, 2021, 10:05 AM IST

ताज्या बातम्या