IPL 2021 : आता मुंबई इंडियन्सच्या सामन्यावरही संकट, समोर आलं धक्कादायक कारण

IPL 2021 : आता मुंबई इंडियन्सच्या सामन्यावरही संकट, समोर आलं धक्कादायक कारण

आयपीएलच्या 14 व्या मोसमावर (IPL 2021) कोरोनाचं संकट आणखी गडद झालं आहे. कोलकात्याच्या (KKR) दोन खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केकेआर आणि आरसीबी (KKR vs RCB) यांच्यातला सोमवारी होणारा सामना पुढे ढकलण्यात आला. यानंतर आता मुंबई आणि हैदराबाद (MI vs SRH) यांच्यातल्या सामन्यावरही संकट ओढावलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मे : आयपीएलच्या 14 व्या मोसमावर (IPL 2021) कोरोनाचं संकट आणखी गडद झालं आहे. कोलकात्याच्या (KKR) दोन खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केकेआर आणि आरसीबी (KKR vs RCB) यांच्यातला सोमवारी होणारा सामना पुढे ढकलण्यात आला. केकेआरचे वरुण चक्रवर्ती (Varun Chkravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrior) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. यानंतर चेन्नई सुपरकिंग्सच्या (CSK) तीन सदस्यांनाही कोरोना झाला आहे, त्यामुळे आयपीएलच्या बायो-बबलवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. चेन्नईच्या टीममधल्या सदस्यांना कोरोना झाल्यामुळे आता मुंबई आणि हैदराबाद (Mumbai Indians vs SRH) यांच्या सामन्यावरही संकट ओढावलं आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, चेन्नईच्या टीममध्ये ज्या तीन जणांना कोरोना झाला आहे, त्यापैकी एकही खेळाडू नाही, पण बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी (Laxmipathi Balaji) याची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 1 मे रोजी चेन्नई आणि मुंबई (CSK vs MI) यांच्यात सामना झाला होता, तेव्हा बालाजी मुंबई इंडियन्सच्या खेळाडू आणि सदस्यांना भेटला. प्रोटोकॉलनुसार मुंबईच्या खेळाडूंना टेस्ट करावी लागेल, तसंच त्यांचे दोन रिपोर्ट निगेटिव्ह यावे लागतील, तेव्हाच मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सामना होऊ शकतो. ही मॅच मंगळवारी असली तरी अजून बीसीसीआयकडून (BCCI) याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातले 60 पैकी 29 सामने झाले आहेत, तर 31 सामने बाकी आहेत. या मॅच दिल्ली, कोलकाता, बँगलोर आणि अहमदाबादमध्ये होणार आहेत. यातले प्रत्येकी 10-10 सामने कोलकाता आणि बँगलोरमध्ये होतील, तर अहमदाबादमध्ये 7 आणि दिल्लीमध्ये 4 मॅच खेळवल्या जातील. सध्या भारतात दिवसाला कोरोनाचे 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत.

यावर्षी भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) होणार आहे. जर कोरोनामुळे आयपीएल स्थगित करावी लागली, तर वर्ल्ड कपच्या आयोजनावरही प्रश्न उपस्थित केले जातील, त्यामुळे बीसीसीआय सावध पावलं टाकत आहे, पण दोन टीममध्ये कोरोनाचा प्रवेश झाल्यामुळे चिंता वाढवली आहे.

Published by: Shreyas
First published: May 3, 2021, 9:22 PM IST

ताज्या बातम्या