मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : मुंबईला एकाच दिवशी दोन धक्के, CSK विरुद्ध राजस्थानचा दणदणीत विजय

IPL 2021 : मुंबईला एकाच दिवशी दोन धक्के, CSK विरुद्ध राजस्थानचा दणदणीत विजय

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये शनिवारचा दिवस मुंबईसाठी डबल धक्का देऊन गेला. मुंबई इंडियन्सचा पहिले दिल्लीविरुद्ध (MI vs DC) पराभव झाल्यानंतर राजस्थाननेही चेन्नईला (CSK vs RR) लोळवलं, त्यामुळे मुंबईचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणं आता आणखी कठीण झालं आहे.

पुढे वाचा ...
    अबु धाबी, 2 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये शनिवारचा दिवस मुंबईसाठी डबल धक्का देऊन गेला. मुंबई इंडियन्सचा पहिले दिल्लीविरुद्ध (MI vs DC) पराभव झाल्यानंतर राजस्थाननेही चेन्नईला (CSK vs RR) लोळवलं, त्यामुळे मुंबईचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणं आता आणखी कठीण झालं आहे. चेन्नईने दिलेलं 190 रनचं आव्हान राजस्थानने 7 विकेट आणि 15 बॉल राखून पूर्ण केलं. याचा फायदा राजस्थानला नेट रनरेटमध्येही झाला आणि पॉईंट्स टेबलमध्ये ते मुंबईच्या वरती गेले आहेत. चेन्नईने ठेवलेल्या 190 रनच्या आव्हानचा पाठलाग करताना राजस्थानचे ओपनर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि एव्हिन लुईस (Evin Lewis) यांनी धमाक्यात सुरुवात केली. जयस्वाल आणि एव्हिन लुईस यांच्या जोडीने राजस्थानला 5 ओव्हरमध्ये 77 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. 21 बॉलमध्ये 50 रन करून जयस्वाल आऊट झाला. त्याने या खेळीमध्ये 6 फोर आणि 3 सिक्स मारले. शिवम दुबे (Shivam Dubey) याने 42 बॉलमध्ये नाबाद 64 रन केले, यात 4 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने 2 आणि आसिफने एक विकेट घेतली. IPL 2021 : एक दिवस दोन सामने, पण Mumbai vs Pune लढतीने वाढवलं Thrill  या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 189 रनपर्यंत मजल मारली. ऋतुराजने 60 बॉलमध्ये नाबाद 101 रन केले. ऋतुराजच्या या खेळीमध्ये 9 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. तर रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 15 बॉलमध्ये नाबाद 32 रन केले. IPL 2021 : जडेजाने नाकारलं, तरी महाराष्ट्राच्या ऋतुराजने केलं 'धोनी स्टाईल' शतक पॉईंट्स टेबलची अवस्था राजस्थानच्या या विजयामुळे मुंबईसाठी प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग आणखी बिकट झाला आहे. मुंबईची टीम सध्या सातव्या क्रमांकावर आहे. 12 मॅचमध्ये मुंबईने 5 मॅच जिंकल्या, तर 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. कोलकाता, पंजाब, राजस्थान आणि मुंबई या चारही टीमनी तेवढ्याच मॅच खेळल्या असून त्यांचे पॉईंट्सही समान आहेत. पण नेट रनरेटमुळे कोलकाता चौथ्या, पंजाब पाचव्या, राजस्थान सहाव्या आणि मुंबई सातव्या क्रमांकावर आहे. चेन्नई आणि दिल्लीची टीम आधीच प्ले-ऑफमध्ये पोहोचली आहे. तर हैदराबाद आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. मुंबई इंडियन्सचा आणखी एक खराब सिझन, रोहितला 'त्रास' देणाऱ्या इतिहासाची पुनरावृत्ती!
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, Delhi capitals, IPL 2021, Mumbai Indians, Rajasthan Royals

    पुढील बातम्या