मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : एक दिवस दोन सामने, पण Mumbai vs Pune लढतीने वाढवलं Thrill

IPL 2021 : एक दिवस दोन सामने, पण Mumbai vs Pune लढतीने वाढवलं Thrill

आयपीएलमध्ये (IPL 2021) एकाच दिवशी मुंबई विरुद्ध दिल्ली (Mumbai Indians vs Delhi Capitals) आणि मग चेन्नई विरुद्ध राजस्थानच्या (CSK vs RR) सामन्याने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं, पण दुसऱ्या मॅचवेळी मुंबई विरुद्ध पुण्याचा (Mumbai vs Pune) सामना युएईच्या मैदानात पाहायला मिळाला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
अबु धाबी, 2 सप्टेंबर : आयपीएलमध्ये (IPL 2021) एकाच दिवशी मुंबई विरुद्ध दिल्ली (Mumbai Indians vs Delhi Capitals) आणि मग चेन्नई विरुद्ध राजस्थानच्या (CSK vs RR) सामन्याने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं, पण दुसऱ्या मॅचवेळी मुंबई विरुद्ध पुण्याचा (Mumbai vs Pune) सामना युएईच्या मैदानात पाहायला मिळाला. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मूळचा पुणेकर असलेल्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) धमाकेदार शतक केलं. आयपीएल करियरमधलं ऋतुराजचं हे पहिलंच शतक आहे. इनिंगच्या अखेरच्या बॉलवर ऋतुराजने धोनी स्टाईलने सिक्स मारत शतक पूर्ण केलं. IPL 2021 : जडेजाने नाकारलं, तरी महाराष्ट्राच्या ऋतुराजने केलं 'धोनी स्टाईल' शतक ऋतुराजने 60 बॉलमध्ये नाबाद 101 रन केले, यामध्ये 9 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. ऋतुराजच्या या शतकाच्या जोरावर चेन्नईने राजस्थानला विजयासाठी 190 रनचं आव्हान दिलं. यानंतर बॅटिंगला आलेल्या मुंबईकर यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) चेन्नईच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. 19 बॉलमध्येच जयस्वालने अर्धशतक पूर्ण केलं. 21 बॉलमध्ये 50 रन करून जयस्वाल आऊट झाला. त्याने या खेळीमध्ये 6 फोर आणि 3 सिक्स मारले. जयस्वाल आणि एव्हिन लुईस यांच्या जोडीने राजस्थानला 5 ओव्हरमध्ये 77 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. एव्हिन लुईसला मुंबईकर असलेल्या शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) आऊट केलं. मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या शिवम दुबे यानेही 31 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याआधी दिवसाच्या सुरुवातीला मुंबईकर असलेल्या पण दिल्लीकडून खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) मुंबईचा पराभव करण्यात मोलाची भूमिका बजावली. मुंबईने ठेवलेल्या 130 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची अवस्था बिकट झाली होती, पण अय्यरने शेवटपर्यंत किल्ला लढवला. 33 बॉलमध्ये नाबाद 33 रन करत दिल्लीला विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यरच्या या खेळीमुळे मुंबईचं प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न धूसर झालं आहे. मुंबई इंडियन्सचा आणखी एक खराब सिझन, रोहितला 'त्रास' देणाऱ्या इतिहासाची पुनरावृत्ती!
First published:

Tags: Csk, Delhi capitals, IPL 2021, Mumbai Indians

पुढील बातम्या