मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा आणखी एक खराब सिझन, रोहितला 'त्रास' देणाऱ्या इतिहासाची पुनरावृत्ती!

IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा आणखी एक खराब सिझन, रोहितला 'त्रास' देणाऱ्या इतिहासाची पुनरावृत्ती!

आयपीएलची (IPL) सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) यंदाचा मोसम (IPL 2021) निराशाजनक ठरला आहे.

आयपीएलची (IPL) सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) यंदाचा मोसम (IPL 2021) निराशाजनक ठरला आहे.

आयपीएलची (IPL) सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) यंदाचा मोसम (IPL 2021) निराशाजनक ठरला आहे.

    दुबई, 2 ऑक्टोबर : आयपीएलची (IPL) सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) यंदाचा मोसम (IPL 2021) निराशाजनक ठरला आहे. टीमने 12 पैकी फक्त 5 मॅच जिंकल्या आहेत, तर 7 सामने गमावले आहेत. यामुळे प्ले-ऑफमध्ये पोहोचणं मुंबईसाठी कठीण झालं आहे. प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी आता त्यांना इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. 2015 ते 2020 या एकूण 6 मोसमात मुंबई 4 वेळा चॅम्पियन झाली. ज्या दोन मोसमात मुंबईला चॅम्पियन होता आलं नाही, त्यात त्यांना प्ले-ऑफमध्येही प्रवेश करता आला नाही. यंदाही मुंबईचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणं धूसर झालं आहे. मुंबई इंडियन्सने 2015 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली, यानंतर 2016 साली त्यांना प्ले-ऑफ गाठता आलं नाही. टीम पाचव्या क्रमांकावर राहिली. 2017 साली रोहितने पुन्हा एकदा टीमला चॅम्पियन बनवलं, तर 2018 साली पुन्हा एकदा टीमला पाचव्या क्रमांकावरच समाधान मानावं लागलं. 2019 आणि 2020 साली मुंबईने आयपीएल ट्रॉफी जिंकली. या मोसमात मुंबई इंडियन्स 10 पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईचा 4 विकेटने पराभव केला. मुंबईने पहिले बॅटिंग करत 8 विकेट गमावून 129 रन केले. दिल्लीने हे आव्हान 6 विकेट गमावून पार केलं. आयपीएल इतिहासात दिल्लीने चौथ्यांदा मुंबईला एकाच मोसमात दोनवेळा पराभूत केलं. याआधी 2009, 2012 आणि 2018 साली दिल्लीने मोसमातल्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईला धूळ चारली होती. मागच्या मोसमात मुंबईने चारही मॅचमध्ये दिल्लीला हरवलं होतं, यात फायनलचाही समावेश होता. इशान किशन-राहुल चहर बाहेर मुंबईने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात लेग स्पिनर राहुल चहरऐवजी (Rahul Chahar) ऑफ स्पिनर जयंत यादवला (Jayant Yadav) संधी दिली. जयंत यादवने 4 बॉलमध्ये 11 रन केले. तर बॉलिंगमध्ये 31 रन देऊन त्याने 1 विकेटही घेतली. याआधी मुंबईने खराब फॉर्ममध्ये असलेल्या इशान किशनलाही (Ishan Kishan) बाहेर बसवलं. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि हार्दिक पांड्यादेखील (Hardik Pandya) या मोसमात संघर्ष करताना दिसत आहेत. जे मुंबईच्या निराशाजनक कामगिरीचं प्रमुख कारण आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, Mumbai Indians

    पुढील बातम्या