Home /News /sport /

IPL 2021 : मुंबईच्या टीममध्ये नव्या फास्ट बॉलरची एण्ट्री, प्रत्येक 19व्या बॉलला घेतो विकेट!

IPL 2021 : मुंबईच्या टीममध्ये नव्या फास्ट बॉलरची एण्ट्री, प्रत्येक 19व्या बॉलला घेतो विकेट!

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडला 19 सप्टेंबर म्हणजेच रविवारपासून सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (MI vs CSK) यांच्यात दुबईमध्ये पहिला सामना होणार आहे. या मॅचआधी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीममध्ये नवा खेळाडू दाखल झाला आहे.

पुढे वाचा ...
    दुबई, 18 सप्टेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडला 19 सप्टेंबर म्हणजेच रविवारपासून सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (MI vs CSK) यांच्यात दुबईमध्ये पहिला सामना होणार आहे. या मॅचआधी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीममध्ये नवा खेळाडू दाखल झाला आहे. मोहसीन खानच्याऐवजी (Mohsin Khan) रूस कलारिया (Roos Kalaria) याची मुंबईच्या टीममध्ये निवड करण्यात आली आहे. कलारियाचा टी-20 रेकॉर्ड चांगला आहे. 5 वेळची चॅम्पियन असलेल्या मुंबईने गुजरातच्या रूस कलारियाला टीममध्ये स्थान दिलं आहे. 28 वर्षांच्या या फास्ट बॉलरने आतापर्यंत 31 टी-20 मॅचमध्ये 37 विकेट घेतल्या आहेत, तसंच त्याचा इकोनॉमी रेटही 6.53 एवढा आहे. टी-20 क्रिकेटच्या हिशोबने हा इकोनॉमी रेट अत्यंत चांगला समजला जातो. एवढच नाही तर त्याचा स्ट्राईक रेटही 18.20 चा आहे. याशिवाय कलारियाने 54 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 168 विकेट घेतल्या, तर 46 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याला 66 विकेट मिळाल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कलारियाने 3 शतकं आणि 5 अर्धशतकंही केली. 2012 सालचा अंडर-19 वर्ल्ड कपही कलारिया खेळला. मुंबई 'हॅट्रिक'साठी मैदानात, धोनी रोखणार रोहितचा विजयी रथ? मुंबईने मोहसिन खानच्याऐवजी कलारियाला टीममध्ये घेतलं आहे. मोहसिन खानही डावखुरा फास्ट बॉलर आहे, पण 23 वर्षांच्या या खेळाडूला मुंबईने संधी दिली नाही. मोहसिनने 23 टी-20 मॅचमध्ये 31 विकेट घेतल्या. याशिवाय उत्तर प्रदेशच्या या बॉलरने एका प्रथम श्रेणी मॅचमध्ये 2 आणि 14 लिस्ट ए मॅचमध्ये 23 विकेट मिळवल्या. IPL 2021 : प्ले-ऑफ मध्ये पोहोचणं या 2 टीमसाठी सोपं, मुंबई अडचणीत! मुंबई चौथ्या क्रमांकावर आयपीएल 2021 च्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर आहे. टीमने 7 पैकी 4 मॅच जिंकल्या, त्यामुळे त्यांच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. तर दिल्लीची टीम 8 पैकी 6 मॅच जिंकत 12 पॉईंट्ससह टॉपवर आहे. चेन्नई 10 पॉईंट्ससह दुसऱ्या आणि बँगलोरही 10 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईची टीम रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, ट्रेन्ट बोल्ट, ईशान किशन, राहुल चहर, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, जयंत यादव, क्रिस लिन, अनुकूल रॉय, अनमोलप्रीत सिंह, रूस कलारिया, एडम मिल्ने, नॅथन कुल्टर नाइल, पियुष चावला, जिमी नीशम, युधवीर चरक, मार्को जेसन, अर्जुन तेंदुलकर IPL 2021 : मुंबईने 'ती' सवय बदलली नाही तर CSK होणार चॅम्पियन! रोहितसाठी धोक्याची घंटा
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, Mumbai Indians

    पुढील बातम्या