मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : मुंबई 'हॅट्रिक'साठी मैदानात, धोनी रोखणार रोहितचा विजयी रथ?

IPL 2021 : मुंबई 'हॅट्रिक'साठी मैदानात, धोनी रोखणार रोहितचा विजयी रथ?

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडला (IPL 2021) 19 सप्टेंबर रविवारपासून सुरुवात होणार आहे. पहिला मुकाबला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (MI vs CSK) यांच्यात होणार आहे. मुंबईने 2019 आणि 2020 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली, त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्यासाठी मुंबईची टीम मैदानात उतरेल. तर दुसरीकडे एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नईला रोहित शर्माचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान असेल.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 18 सप्टेंबर : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडला (IPL 2021) 19 सप्टेंबर रविवारपासून सुरुवात होणार आहे. पहिला मुकाबला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (MI vs CSK) यांच्यात होणार आहे. या मोसमात पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम (Chennai Super Kings) 7 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबईने (Mumbai Indians) 7 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत. रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम 8 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईने 2019 आणि 2020 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली, त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्यासाठी मुंबईची टीम मैदानात उतरेल. तर दुसरीकडे एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नईला रोहित शर्माचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान असेल.

आयपीएल इतिहासात कोणत्याच टीमला लागोपाठ 3 आयपीएल ट्रॉफी जिंकता आल्या नाहीत, त्यामुळे रोहित शर्माची मुंबई इंडियन्स नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे. सर्वाधिक 5 वेळा आयपीएल जिंकण्याचा विक्रमही मुंबई इंडियन्सच्याच नावावर आहे. दुसरीकडे चेन्नईची टीम तीन वेळा आयपीएल चॅम्पियन झाली आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात चेन्नईची कामगिरी निराशाजनक झाली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला प्ले-ऑफमध्ये स्थान पटकावण्यात अपयश आलं होतं.

IPL 2021 : प्ले-ऑफ मध्ये पोहोचणं या 2 टीमसाठी सोपं, मुंबई अडचणीत!

मुंबईने केला चेन्नईचा पराभव

पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई मुंबईच्या पुढे असली तरी या मोसमात आधीच्या सामन्यात मुंबईने चेन्नईचा पराभव केला होता. 1 मे रोजी दिल्लीत झालेल्या सामन्यात मुंबईचा 4 विकेटने रोमांचक विजय झाला होता. चेन्नईने पहिले बॅटिंग करत 218/4 एवढा स्कोअर केला. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने अखेरच्या बॉलवर 6 विकेट गमावून केला. पोलार्डने 34 बॉलमध्ये नाबाद 84 रन केले. दुबईमध्ये होणाऱ्या या दुसऱ्या सामन्यात पुन्हा मोठा स्कोअर बघायला मिळू शकतो.

डुप्लेसिस-रोहित टॉपवर

चेन्नईकडून या मोसमात सर्वाधिक रन फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plessis) केले आहेत. 7 मॅचमध्ये 64 च्या सरासरीने त्याने 320 रन केले, यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 145 चा आहे. तर मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 250 रन केले आणि एक अर्धशतक झळकावलं. रोहितचा स्ट्राईक रेटही 128 चा आहे. आयपीएलचा पहिला राऊंड भारतात झाला होता, तेव्हा कोणत्याच टीमना घरच्या मैदानात खेळता आलं नव्हतं. मुंबईला चेन्नईमध्ये 5 सामने खेळावे लागले होते. चेन्नईची खेळपट्टी स्पिन बॉलिंगला अनुकूल असल्यामुळे मुंबईचे बॅट्समन संघर्ष करत होते.

राहुल चहर मुंबईचा यशस्वी बॉलर

बॉलिंगमध्ये राहुल चहर (Rahul Chahar) मुंबईचा सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. या लेग स्पिनरन 7 मॅचमध्ये 18 च्या सरासरीने 11 विकेट घेतल्या. त्याचा इकोनॉमी रेटही 7.21 एवढा होता. 27 रन देऊन 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. या प्रदर्शनामुळेच राहुल चहरची टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. दुसरीकडे चेन्नईकडून फास्ट बॉलर सॅम करनने सर्वाधिक 9 विकेट घेतल्या आहेत.

मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत 31 मॅच झाल्या, यातल्या 19 मॅचमध्ये मुंबईचा तर 12 मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला. मागच्या मोसमात दोन्ही टीमनी एक-एक मॅच जिंकली. तर 2019 साली चारही सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला होता.

मुंबईची टीम

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, ट्रेन्ट बोल्ट, ईशान किशन, राहुल चहर, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, जयंत यादव, क्रिस लिन, अनुकूल रॉय, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, एडम मिल्ने, नॅथन कुल्टर नाइल, पियुष चावला, जिमी नीशम, युधवीर चरक, मार्को जेसन, अर्जुन तेंदुलकर

चेन्नईची टीम

महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, सॅम करेन, जॉश हेजलवूड, इमरान ताहिर, फाफ डुप्लेसिस, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चहर, कर्ण शर्मा, अंबाती रायडू, मिचेल सॅन्टनर, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, केएल आसिफ, लुंगी एनगिडी, साई किशोर, मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, एम हरिशंकर रेड्डी, के भगत वर्मा, के हरी निशांत

IPL 2021 Live Streaming: CSK vs MI चा मुकाबला, कधी आणि कुठे पाहता येणार?

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni, Mumbai Indians, Rohit sharma