• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : मुंबईने 'ती' सवय बदलली नाही तर CSK होणार चॅम्पियन! रोहितसाठी धोक्याची घंटा

IPL 2021 : मुंबईने 'ती' सवय बदलली नाही तर CSK होणार चॅम्पियन! रोहितसाठी धोक्याची घंटा

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडला रविवारपासून सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना गतविजेती मुंबई इंडियन्स आणि एमएस धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्समध्ये (Mumbai Indians vs Chennai Super Kings) होणार आहे.

 • Share this:
  दुबई, 17 सप्टेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडला रविवारपासून सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना गतविजेती मुंबई इंडियन्स आणि एमएस धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्समध्ये (Mumbai Indians vs Chennai Super Kings) होणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) याने मुंबई इंडियन्सना त्यांची जुनी सवय बदलायचा सल्ला दिला आहे. मुंबईने त्यांची ही सवय बदलली नाही, तर चेन्नई सुपरकिंग्स आयपीएल चॅम्पियन होऊ शकते, असं भाकीत पीटरसनने वर्तवलं आहे. मुंबईला नेहमीप्रमाणे संथ सुरुवात करुन चालणार नाही, असं पीटरसन म्हणाला आहे. पाचवेळची चॅम्पियन मुंबई, दोनवेळची चॅम्पियन चेन्नई, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-4 वर आहेत. मे महिन्यात आयपीएल बायो-बबलमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता युएईमध्ये उरलेले सामने खेळवले जाणार आहेत. पीटरसनने बेटवे डॉट कॉम मध्ये एक ब्लॉग लिहिला, त्यात त्याने आपलं मत मांडलं. 'प्रत्येकजण गतविजेत्या मुंबई इंडियन्सकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत आहे, पण त्यांचा इतिहास क्रमवारीत अव्वल राहण्याचा नाही. ते पहिले काही सामने गमावतात आणि मग स्पर्धेच्या अखेरीस चांगलं पुनरागमन करतात, पण आता आपण आधीच स्पर्धेच्या शेवटाकडे आहोत. मुंबईची टीम तीन-चार मॅच गमावण्याचा धोका पत्करू शकत नाहीत, कारण पुनरागमनासाठी फार वेळ असणार नाही. मुंबईला ट्रॉफी जिंकायची असेल, तर त्यांना पहिल्या बॉलपासूनच दबाव बनवावा लागेल. मुंबईच्या टीमची प्रतिभा बघता ते असं करू शकतात,' असं पीटरसन म्हणाला. दुसरीकडे चेन्नईच्या टीमसाठी 2020 चा मोसम निराशाजनक राहिला. युएईमध्येच झालेल्या मागच्या मोसमात चेन्नईच्या टीमला प्ले-ऑफमध्येही स्थान मिळालं नव्हतं. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला प्ले-ऑफ गाठण्यात अपयश आलं होतं. यावेळी मात्र चेन्नईची टीम धमाका करण्यासाठी तयार असेल, असं पीटरसनला वाटतं. मुंबई इंडियन्स होणार नवं सत्ताकेंद्र, 2 दिग्गज सांभाळणार टीम इंडियाची जबाबदारी! 'एप्रिल महिन्यात आयपीएल सुरु होण्याआधी सगळे जण चेन्नई सुपरकिंग्सना म्हातारे म्हणत होते, पण त्यांची कामगिरी बघून मीदेखील हैराण झालो. फाफ डुप्लेसिस, मोईन अली आणि सॅम करन या परदेशी खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. या चार महिन्यांमध्ये त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल, हे सांगू शकत नाही. त्यांना फॉर्ममध्ये परतायला वेळ लागू शकतो, कारण त्यांच्या टीममधल्या खेळाडूंचं वय जास्त आहे. जर ते आधीपासूनच तयार असतील, तर त्यांच्यासाठी पुढचे काही आठवडे ऐतिहासिक असतील. त्यांना ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. अनेकांना ते ट्रॉफीपासून खूप लांब आहेत, असं वाटत होतं,' असं पीटरसनने त्याच्या ब्लॉगमध्ये लिहिलं.
  Published by:Shreyas
  First published: