मुंबई, 22 सप्टेंबर : चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या (CSK) पराभवानंतर गतविजेती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs KKR) गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मैदानात उतरेल. मागच्या सामन्यात मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याशिवाय (Hardik Pandya) मैदानात उतरली होती. या दोघांना छोटी दुखापत झाली होती, त्यामुळे त्यांना विश्रांती देण्यात आली. चेन्नईने या मॅचमध्ये मुंबईचा 20 रनने पराभव केला. मुंबईचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेने (Mahela Jayawardene) दिलेल्या माहितीनुसार कोलकात्याविरुद्धच्या मॅचसाठी रोहित शर्मा निवडीसाठी उपलब्ध आहे. दुसरीकडे कोलकात्याने दुसऱ्या राऊंडमधल्या आपल्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) 9 विकेटने पराभव केला. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स 8 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला तर 4 मॅच त्यांनी गमावल्या आहेत. टॉप-4 मध्ये कायम राहण्यासाठी मुंबईला विजय गरजेचा आहे. ‘या’ कारणामुळे चेन्नईविरुद्ध खेळला नाही रोहित, मोठ्या नियोजनाचा आहे भाग मुंबईला रोहितकडून अपेक्षा रोहित शर्मा गेल्या काही काळापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हा फॉर्म कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात 156 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून सौरभ तिवारीशिवाय (Saurabh Tiwary) कोणत्याच बॅट्समनला चांगली कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे पहिल्या राऊंडमध्ये संघर्ष करणाऱ्या केकेआरने दुसऱ्या राऊंडच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीला धूळ चारली. इयन मॉर्गनच्या नेतृत्वात खेळणारी केकेआर पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. आरसीबीविरुद्ध मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती (Varun Chakrawarthy) आणि ऑलराऊंडर आंद्रे रसेल (Andre Russell) यांनी उत्कृष्ट बॉलिंग केली. यानंतर शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांच्या बॅटिंगमुळे कोलकात्याने हा सामना 10 ओव्हर बाकी असतानाच जिंकला. मुंबईची टीम रोहित शर्मा (कर्णधार) क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, क्रिस लिन, सौरभ तिवारी, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जेम्स नीशाम, जयंत यादव, कायरन पोलार्ड , मार्को जेनसन, युद्धवीर सिंग, एडम मिल्ने, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, मोहसिन खान, नॅथन कूल्टर-नाइल, पियुष चावला, राहुल चाहर, ट्रेण्ट बोल्ट कोलकात्याची टीम ऑयन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, गुरकीरत सिंग मान, करुण नायर, नीतीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, हरभजन सिंग, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पवन नेगी, एम प्रसिद्ध कृष्णा, संदीप वारियर , शिवम दुबे, टीम साउदी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शाकिब अल हसन, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, शेल्डन जॅक्सन, टीम सायफर्ट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.