मुंबई, 22 सप्टेंबर : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील (IPL 2021, Phase 2) पहिली मॅच खेळला नव्हता. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये (CSK vs MI) फिट नसल्यानं रोहित खेळला नाही, असं मुंबई इंडियन्सनच्या (Mumbai Indians) वतीने सांगण्यात आले होते. पण हे संपूर्ण सत्य नाही. रोहितचं न खेळणं हे मोठ्या नियोजनाचा भाग असल्याची माहिती समोर आली आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ नं मुंबई इंडियन्सच्या सूत्रांच्या आधारे हे वृत्त दिलं आहे. रोहित शर्मा सध्या पुढील दोन वर्षांचा रोडमॅप तयार करत आहे. त्यानुसार 2023 साली होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत टीम इंडियाला जास्तीत जास्त प्राथमिकता देण्याचा निर्णय रोहितनं घेतला आहे. त्यानुसार रोहित आयपीएल स्पर्धेत आराम करत आहे. मागील आयपीएल स्पर्धेत रोहितला दुखापत झाली होती. त्यानंतरही तो याच कारणामुळे बराच काळ टीमच्या बाहेर होता. मुंबई इंडियन्समधील ‘या’ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आमच्यासाठी भारत सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वाचा आहे. आयपीएल स्पर्धेनंतर लगेच वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. टीम इंडियाचा विचार करुन रोहितच्या वर्कलोडची काळजी घेतली जात आहे. चेन्नई विरुद्ध रोहितचं न खेळणं देखील याच रणनीतीचा भाग होता. त्याच्या फिटनेसचा काही प्रश्न नाही. वर्ल्ड कप स्पर्धेचा विचार करुन रोहित आवश्यकतेनुसार ब्रेक घेईल. रोहित शर्मा आता 34 वर्षांचा आहे. त्याच्या करिअरमधील शेवटची 2-3 वर्ष जास्तीत जास्त भारतीय क्रिकेट टीमकडून खेळण्याची त्याची इच्छा आहे.’ विराट लवकरच देणार तिसरा धक्का, T20 वर्ल्ड कपनंतर ‘या’ प्रकारातून होणार निवृत्त! ‘हे’ आहे सर्वात मोठं लक्ष्य रोहित शर्माचं ऑक्टोबर 2023 पर्यंत टीम इंडियासाठी स्वत:ला फिट राखण्याचं लक्ष्य आहे. 2023 साली भारतामध्ये वन-डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. तसंच त्यापूर्वी दोन टी20 वर्ल्ड कप स्पर्धा देखील टीम इंडिया खेळणार आहे. या तिन्ही वर्ल्ड कपच्या तयारीत कोणतीही कमतरता राहू नये, हे रोहितचं सर्वात मोठं लक्ष्य आहे. RCB मध्ये होणार भूकंप! विराट कोहलीची कर्णधारपदावरुन हकालपट्टी होणार? 2011 चा वर्ल्ड कप न खेळल्याबद्दल रोहितनं यापूर्वी अनेकदा निराशा व्यक्त केली आहे. भारतामध्ये झालेला तो वर्ल्ड कप खेळता न येणं हे खूप त्रासदायक होतं, असं मत रोहितनं व्यक्त केलं आहे. त्यामुळेच तो कदाचित ही निराशा 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये दूर करण्याची त्याची इच्छा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.