Home /News /sport /

IPL 2021, MI vs CSK : चेन्नईचा एकटा खेळाडू मुंबईवर भारी, ठोकल्या 200 सिक्स

IPL 2021, MI vs CSK : चेन्नईचा एकटा खेळाडू मुंबईवर भारी, ठोकल्या 200 सिक्स

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडला आजपासून सुरुवात होत आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (MI vs CSK) यांच्यात दुबईमध्ये होणार आहे.

    दुबई, 19 सप्टेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडला आजपासून सुरुवात होत आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (MI vs CSK) यांच्यात दुबईमध्ये होणार आहे. या मॅचमध्ये मुंबईचं पारडं जड आहे. संध्याकाळी 7.30 वाजता या मॅचला सुरुवात होणार आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत 31 मॅच झाल्या, यातल्या 19 मॅचमध्ये मुंबईचा तर 12 मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला. मागच्या मोसमात दोन्ही टीमनी एक-एक मॅच जिंकली. तर 2019 साली चारही सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला होता. याआधी याच मोसमात चेन्नईविरुद्ध (Chennai Super Kings) झालेल्या सामन्यात मुंबईचा शेवटच्या बॉलवर रोमांचक विजय झाला होता. चेन्नईने पहिले बॅटिंग करत 218/4 एवढा स्कोअर केला. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने अखेरच्या बॉलवर 6 विकेट गमावून केला. पोलार्डने (Kieron Pollard) 34 बॉलमध्ये नाबाद 84 रन केले. दुबईमध्ये होणाऱ्या या दुसऱ्या सामन्यात पुन्हा मोठा स्कोअर बघायला मिळू शकतो. IPL 2021 : मुंबईचा मुकाबला चेन्नईशी, अशी असणार रोहितची Playing XI मुंबईचं चेन्नईविरुद्धचं रेकॉर्ड चांगलं असलं तरी या मोसमात मुंबईच्या बॅटिंगला संघर्ष करावा लागला आहे. संपूर्ण मोसमात मुंबईच्या बॅट्समनना फक्त 4 अर्धशतकं करता आली आहेत. तर दुसरीकडे चेन्नईचा ओपनर फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plessis) एकट्यानेच 4 अर्धशतकं केली आहेत. चेन्नईविरुद्धच्या मॅचआधी समोर आली मुंबईची सगळ्यात मोठी 'कमजोरी' फाफ डुप्लेसिसला दुखापत झाल्यामुळे तो पहिला सामना खेळेल का नाही, याबाबत साशंकता आहे. या मोसमातल्या 7 मॅचमध्ये 64 च्या सरासरीने त्याने 320 रन केले आहेत, यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 29 फोर आणि 13 सिक्स फटकावले. फाफचा स्ट्राईक रेटही 145 चा आहे. नाबाद 95 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. टी-20 वर्ल्ड कपमधून डच्चू 37 वर्षांच्या फाफ डुप्लेसिसला दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) टीममधून डच्चू दिला आहे, त्यामुळे अनेकांना धक्का बसला. 257 मॅचमध्ये त्याने 31 च्या सरासरीने 6,532 रन केले, यात 2 शतकं आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 मध्ये त्याने 573 फोर आणि 203 सिक्स मारले, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 129 चा आहे. 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 36 च्या सरासरीने 1,528 रन केले आणि एक शतक तसंच 10 अर्धशतक केली. IPL 2021: मुंबईच्या मॅचपूर्वी धोनीनं दाखवलं ट्रेलर, VIDEO पाहून वाढलं रोहितचं टेन्शन आयपीएलमध्ये 2500 पेक्षा जास्त रन फाफ डुप्लेसिस 2012 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. चेन्नईशिवाय तो पुण्याच्या टीमसोबतही खेळला. या स्पर्धेत त्याने 91 मॅचमध्ये 35 च्या सरासरीने 2,622 रन केले आणि 20 अर्धशतकं केली. त्याचा स्ट्राईक रेटही 131 चा आहे. मुंबईकडून या मोसमात रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, क्विंटन डिकॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी एक-एक अर्धशतक केलं आहे. मुंबईने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली, तर चेन्नईला तीनवेळा ट्रॉफी पटकवाण्यात यश आलं. IPL 2021: मुंबई आणि चेन्नईची होणार परीक्षा, दोन्ही टीमसमोर असेल 'हे' आव्हान
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, Mumbai Indians

    पुढील बातम्या