IPL 2021 : मुंबईचा मुकाबला चेन्नईशी, अशी असणार रोहितची Playing XI
IPL 2021 : मुंबईचा मुकाबला चेन्नईशी, अशी असणार रोहितची Playing XI
आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडला 19 सप्टेंबर म्हणजेच रविवारपासून सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (MI vs CSK) यांच्यात होणार आहे.
दुबई, 18 सप्टेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडला 19 सप्टेंबर म्हणजेच रविवारपासून सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (MI vs CSK) यांच्यात होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर टॉस 7 वाजता होईल.
मुंबई चौथ्या क्रमांकावर
आयपीएल 2021 च्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चौथ्या क्रमांकावर आहे. टीमने 7 पैकी 4 मॅच जिंकल्या, त्यामुळे त्यांच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. तर दिल्लीची टीम 8 पैकी 6 मॅच जिंकत 12 पॉईंट्ससह टॉपवर आहे. चेन्नई 10 पॉईंट्ससह दुसऱ्या आणि बँगलोरही 10 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
याआधी याच मोसमात चेन्नईविरुद्ध (Chennai Super Kings) झालेल्या सामन्यात मुंबईचा शेवटच्या बॉलवर रोमांचक विजय झाला होता. चेन्नईने पहिले बॅटिंग करत 218/4 एवढा स्कोअर केला. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने अखेरच्या बॉलवर 6 विकेट गमावून केला. पोलार्डने (Kieron Pollard) 34 बॉलमध्ये नाबाद 84 रन केले. दुबईमध्ये होणाऱ्या या दुसऱ्या सामन्यात पुन्हा मोठा स्कोअर बघायला मिळू शकतो.
मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत 31 मॅच झाल्या, यातल्या 19 मॅचमध्ये मुंबईचा तर 12 मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला. मागच्या मोसमात दोन्ही टीमनी एक-एक मॅच जिंकली. तर 2019 साली चारही सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला होता.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबईचे 11 खेळाडू जवळपास निश्चित आहेत, फक्त एका जागेवरून तीन खेळाडूंमध्ये स्पर्धा पाहायला मिळू शकते. आठव्या क्रमांकावर मुंबईकडे जेम्स नीशम, नॅथन कुल्टर नाईल आणि एडम मिल्ने हे तीन फास्ट बॉलर्सचे पर्याय आहेत जे बॅटिंगही करू शकतात. एडम मिल्ने याने नुकत्याच झालेल्या द हंड्रेड स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती.
मुंबईची संभाव्य टीम
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, जेम्स नीशम/नॅथन कुल्टर-नाइल/ एडम मिल्ने, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह
चेन्नईची संभाव्य टीम
ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, सॅम करन, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार/विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, दीपक चहर, जॉस हेजलवूड/लुंगी एनगिडी, इम्रान ताहीर
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.