जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: मुंबई आणि चेन्नईची होणार परीक्षा, दोन्ही टीमसमोर असेल 'हे' आव्हान

IPL 2021: मुंबई आणि चेन्नईची होणार परीक्षा, दोन्ही टीमसमोर असेल 'हे' आव्हान

IPL 2021: मुंबई आणि चेन्नईची होणार परीक्षा, दोन्ही टीमसमोर असेल 'हे' आव्हान

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दोन यशस्वी टीमच्या लढतीनं या स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021 Phase 2) सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर चेन्नईची टीम पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या तर मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावर आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दुबई, 19 सप्टेंबर : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांच्यातील आयपीएल लढत रविवारी दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दोन यशस्वी टीमच्या लढतीनं या स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021 Phase 2) सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर चेन्नईची टीम पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या तर मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईनं युएईमध्ये झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये चेन्नईचा पराभव केला होता. महेंद्रसिंह धोनीच्या टीमसाठी (MS Dhoni) मागील सिझन खराब गेला होता. दुबईचे हवामान हे दोन्ही टीमसाठी आव्हानात्मक असणार आहे. दुबईत अधिक उष्ण हवामान असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेळाडूंना त्रास होऊ शकतो. स्पिनर्सचा असेल दबदबा दिल्ली कॅपिटल्सचा फास्ट बॉलर एनरिक नॉर्खिया यानंही हे हवामान जास्तच उष्ण असल्याचं म्हंटलं आहे. दुबईतील तापमान 40 डिग्री सेल्सियसपर्यंत असण्याची शक्यता आहे. संध्याकाळी हे आणखी कमी होईल. कुठं थांबली होती IPL?; मुंबई इंडियन्सचा आजचा विजय ठरु शकतो Game Changer या मॅचमध्ये स्पिनर्सची भूमिका दोन्ही टीमसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. दुबईतील पिच स्लो झाल्यानंतर स्पिनर्ससाठी अनकूल ठरेल. या पिचवर 170 हा चांगला स्कोअर मानला जातो. स्पिनर्सच्या बाबतीत चेन्नईची टीम मुंबईवर वरचढ आहे. चेन्नईकडं रविंद्र जडेजा आणि इम्रान ताहीर हे दोन अनुभवी स्पिनर्स आहेत. तर मुंबईकडं राहुल चहर आहे. PURPLE CAP: याआधी याच मोसमात चेन्नईविरुद्ध (Chennai Super Kings) झालेल्या सामन्यात मुंबईचा शेवटच्या बॉलवर रोमांचक विजय झाला होता. चेन्नईने पहिले बॅटिंग करत 218/4 एवढा स्कोअर केला. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने अखेरच्या बॉलवर 6 विकेट गमावून केला. पोलार्डने (Kieron Pollard)  34 बॉलमध्ये नाबाद 84 रन केले होते. IPL पूर्वी ख्रिस गेलनं पाकिस्तानबद्दल केलेल्या वक्तव्यानं खळबळ, Tweet Viral मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत 31 मॅच झाल्या, यातल्या 19 मॅचमध्ये मुंबईचा तर 12 मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला. मागच्या मोसमात दोन्ही टीमनी एक-एक मॅच जिंकली. तर 2019 साली चारही सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात