दुबई, 19 सप्टेंबर: दुबईच्या वाळवंटामध्ये यंदा महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) बॅटमधून रनचा वर्षाव होण्याची चिन्हं आहेत. धोनीसाठी मागील आयपीएल सिझन निराशाजनक ठरला होता. या आयपीएलच्या पुर्वार्धात चेन्नईच्या (Chennai Super Kings) बॅट्समननं चांगला खेळ केला. पण, धोनी फ्लॉप ठरला होता. यंदा मागील अपयशाची भरपाई करण्याचा त्याचा निर्धार आहे. आयपीएल स्पर्धेच्या तयारीसाठी चेन्नईची टीम काही आठवड्यांपूर्वीच दुबईत दाखल झाली आहे. या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा मेंटॉर असलेला धोनी चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद मिळवण्याच्या निर्धारानं उतरणार आहे. धोनी दुबईतील मैदानात सध्या जोरदार तयारी करत आहे. त्याच्या बॅटींगचा एक व्हिडीओ सीएसकेनं (CSK) सोशल मीडियावर शेअर केला आहे.
All arealayum Thala...🥳#WhistlePodu #Yellove 🦁💛 @msdhoni pic.twitter.com/Zu85aNrRQj
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 18, 2021
हा व्हिडीओ पाहून त्याच्या तयारीचं ट्रेलर पाहयला मिळतंय. धोनी सर्वच बॉलर्सची जोरदार धुलाई करत आहे. तसंच त्याच्या बॅटमधून पुर्वीसारखेच सहज सिक्स निघत आहेत. धोनीचा हा व्हिडीओ पाहून रोहित शर्माची (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीम आणि त्यांच्या फॅनचं टेन्शन वाढणार आहे. कारण, या टप्प्यात चेन्नईची पहिली मॅच मुंबईविरुद्ध (CSK vs MI) होणार आहे. ORANGE CAP: या मोसमात पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम (Chennai Super Kings) 7 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबईने (Mumbai Indians) 7 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत. रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम 8 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईने 2019 आणि 2020 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली, त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्यासाठी मुंबईची टीम मैदानात उतरेल. तर दुसरीकडे एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नईला रोहित शर्माचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान असेल. IPL 2021: मुंबई आणि चेन्नईची होणार परीक्षा, दोन्ही टीमसमोर असेल ‘हे’ आव्हान मुंबईनं केला होता चेन्नईचा पराभव पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई मुंबईच्या पुढे असली तरी या मोसमात आधीच्या सामन्यात मुंबईने चेन्नईचा पराभव केला होता. 1 मे रोजी दिल्लीत झालेल्या सामन्यात मुंबईचा 4 विकेटने रोमांचक विजय झाला होता. चेन्नईने पहिले बॅटिंग करत 218/4 एवढा स्कोअर केला. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने अखेरच्या बॉलवर 6 विकेट गमावून केला. पोलार्डने 34 बॉलमध्ये नाबाद 84 रन केले. दुबईमध्ये होणाऱ्या या दुसऱ्या सामन्यात पुन्हा मोठा स्कोअर बघायला मिळू शकतो.