मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : धोनीच्या नावावर नकोसा विक्रम, आयपीएल इतिहासातली सगळ्यात 'वाईट' बॅटिंग

IPL 2021 : धोनीच्या नावावर नकोसा विक्रम, आयपीएल इतिहासातली सगळ्यात 'वाईट' बॅटिंग

आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सची (CSK) टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या सगळ्याचं श्रेय कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) दिलं जातं, पण एमएस धोनीला या मोसमात बॅटिंगमध्ये मात्र बराच संघर्ष करावा लागला आहे.

आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सची (CSK) टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या सगळ्याचं श्रेय कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) दिलं जातं, पण एमएस धोनीला या मोसमात बॅटिंगमध्ये मात्र बराच संघर्ष करावा लागला आहे.

आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सची (CSK) टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या सगळ्याचं श्रेय कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) दिलं जातं, पण एमएस धोनीला या मोसमात बॅटिंगमध्ये मात्र बराच संघर्ष करावा लागला आहे.

दुबई, 4 ऑक्टोबर : आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सची (CSK) टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएल प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी चेन्नई पहिलीच टीम ठरली. मागच्या मोसमात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या चेन्नईने यंदा 13 पैकी 9 मॅच जिंकल्या, तर फक्त 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. मागच्या मोसमात चेन्नईला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नव्हता, पण एका वर्षाच्या आत चेन्नईच्या टीमने कामगिरीमध्ये सुधारणा केली. या सगळ्याचं श्रेय कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) दिलं जातं, पण एमएस धोनीला या मोसमात बॅटिंगमध्ये मात्र बराच संघर्ष करावा लागला आहे.

दिल्लीविरुद्धच्या (DC vs CSK) सामन्यात धोनीच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. आयपीएल इतिहासातली धोनीची ही सगळ्यात संथ खेळी (कमीत कमी 25 बॉल खेळून) ठरली. रॉबिन उथप्पाची विकेट गेल्यानंतर धोनी बॅटिंगला आला आणि 20 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला आवेश खानने त्याला माघारी पाठवलं. धोनीने 27 बॉलमध्ये 18 रन केले, यात त्याला एकही फोर किंवा सिक्स मारता आली नाही. 66.67 च्या स्ट्राईक रेटने धोनीने बॅटिंग केली. याआधी 2008 साली धोनीने संथ खेळी केली होती. डेक्कन चार्जर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 74.19 च्या स्ट्राईक रेटने 23 रन केले होते, त्यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 74.19 एवढा होता.

IPL 2021 : एमएस धोनीने जिगरी दोस्तालाच केलं बाहेर, CSK चा कठोर निर्णय

आयपीएल इतिहासात 25 बॉल खेळल्यानंतरही एकही बाऊंड्री न मारण्याचं रेकॉर्ड धोनीच्या नावावर दुसऱ्यांदा झालं आहे. याआधी 2009 साली आरसीबीविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये धोनीने 30 बॉलमध्ये 28 रन केले होते, तेव्हाही त्याला एकही बाऊंड्री मारता आली नव्हती.

आयपीएलच्या या मोसमात धोनीने 13 मॅचच्या 9 इनिंगमध्ये 14 च्या सरासरीने आणि 97.67 च्या स्ट्राईक रेटने फक्त 84 रन केल्या आहेत. या मोसमात त्याने 7 फोर आणि 2 सिक्स मारल्या. दिल्लीविरुद्ध केलेल्या 18 रन हाच त्याचा या मोसमातला सर्वाधिक स्कोअर आहे.

IPL 2021 : वादळी खेळीनंतर यशस्वी CSK च्या ड्रेसिंग रूममध्ये, धोनीने दिलं आयुष्यभर लक्षात राहणारं गिफ्ट!

उथप्पाची विकेट नवव्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला गेली तेव्हा चेन्नईचा स्कोअर 62/4 असा होता. यानंतर धोनी बॅटिंगला आला, पण त्याच्या या रणनितीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयपीएलच्या या संपूर्ण मोसमात धोनी संघर्ष करत आहे, तर रविंद्र जडेजाने यंदाच्या आयपीएलमध्ये तुफान फटकेबाजी केली आहे. मग चेन्नईचा स्कोअर फार नसताना आणि जलद रन करण्याची गरज असताना जडेजाला बॅटिंगला का पाठवण्यात आलं नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या मॅचमध्ये जडेजाला फक्त 2 बॉलच खेळायची संधी मिळाली, यात त्याने 1 रन काढली. जडेजाने या मोसमात 13 सामन्यांच्या 10 इनिंगमध्ये 70.66 ची सरासरी आणि 152.51 च्या स्ट्राईक रेटने 212 रन केले आहेत.

IPL 2021 : जडेजानंतर मांजरेकरांच्या निशाण्यावर धोनी, माहीचा फॉर्म पाहून चाहत्यांनाच दिला सल्ला

First published:
top videos

    Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni