जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : वादळी खेळीनंतर यशस्वी CSK च्या ड्रेसिंग रूममध्ये, धोनीने दिलं आयुष्यभर लक्षात राहणारं गिफ्ट!

IPL 2021 : वादळी खेळीनंतर यशस्वी CSK च्या ड्रेसिंग रूममध्ये, धोनीने दिलं आयुष्यभर लक्षात राहणारं गिफ्ट!

IPL 2021 : वादळी खेळीनंतर यशस्वी CSK च्या ड्रेसिंग रूममध्ये, धोनीने दिलं आयुष्यभर लक्षात राहणारं गिफ्ट!

राजस्थान रॉयल्सचा ओपनर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (CSK vs RR) आक्रमक खेळी केली. यानंतर यशस्वी जयस्वाल त्याचा गुरू आणि चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) भेटायला गेला.

  • -MIN READ
  • Last Updated :

अबु धाबी, 3 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्सचा ओपनर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (CSK vs RR) आक्रमक खेळी केली. 19 बॉलमध्येच जयस्वालने अर्धशतक झळकावलं. 21 बॉलमध्ये 50 रन करून जयस्वाल आऊट झाला. त्याच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. आयपीएल इतिहासात सगळ्यात वेगवान अर्धशतक करणारा जयस्वाल दुसरा अनकॅप खेळाडू ठरला आहे. जॉश हेजलवूड आणि सॅम करन यांच्यासारख्या दिग्गज बॉलर्सचीही त्याने धुलाई केली. यशस्वीच्या या खेळीमुळे राजस्थानने हा सामना 15 बॉल राखत विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या या विजयानंतर यशस्वी जयस्वाल त्याचा गुरू आणि चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) भेटायला गेला. धोनीनेही या भेटीदरम्यान यशस्वीला स्पेशल गिफ्ट दिलं. यशस्वीच्या जर्सी आणि बॅटवर धोनीने त्याची सही केली. जयस्वालने हे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. ‘महान खेळाडू एमएस धोनीला भेटलो तो क्षण. बॅटवर सही मिळाल्यामुळे खूप आनंदी झालो आहे. माझ्यासाठी ते प्रेरणास्त्रोत आहेत, ’ असं ट्वीट यशस्वी जयस्वालने केलं.

जाहिरात

यशस्वी जयस्वाल याने आपल्या या यशाचं श्रेय सचिन तेंडुलकरलाही दिलं आहे. आयपीएलचा दुसरा राऊंड सुरू होण्याआधी सचिनसोबत यशस्वीचं एक ट्रेनिंग सेशन झालं. या सेशनमध्ये सचिनने आपल्याला काही सल्ले दिले आणि आपला खेळ बदलला, असं यशस्वीने सांगितलं. आयपीएल सुरू व्हायच्या आधी मुंबईची टीम ओमानच्या दौऱ्यावर होती. या दौऱ्यात वनडे आणि टी-20 मॅचची सीरिज झाली. या सीरिजच्या 4 सामन्यांमध्ये यशस्वीने 212 रन केले. IPL 2021: सचिनच्या मंत्रामुळे ‘यशस्वी’ झालो, भारताच्या नव्या स्टारनं दिलं मास्टर ब्लास्टरला श्रेय यशस्वी जयस्वालने आयपीएलच्या या मोसमात 8 मॅचमध्ये 151 च्या स्ट्राईक रेटने 237 रन केले आहेत, यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. तसंच त्याने या मोसमात 29 फोर आणि एक सिक्सही मारला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात