मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: CSK ला 'या' खेळाडूवर 9 कोटी खर्च करणं पडलं महागात, आली पश्चातापाची वेळ

IPL 2021: CSK ला 'या' खेळाडूवर 9 कोटी खर्च करणं पडलं महागात, आली पश्चातापाची वेळ

IPL 2021: CSK ला 'या' खेळाडूवर 9 कोटी खर्च करणे पडले महागात

IPL 2021: CSK ला 'या' खेळाडूवर 9 कोटी खर्च करणे पडले महागात

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर: आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी झालेल्या लिलावात (ipl 2021 auction) अनेक खेळाडूंना त्यांच्या बेस पाइसपेक्षा अधिक किमत मिळाली आहे. या यादीमध्ये नेट गोलंदाज कृष्णप्पा गौतम हादेखील आहे. चेन्नई सुपर किंग्जने गौतमला (krishnappa gowtham ) 9 कोटी 25 लाख रुपयांनी विकत घेतले. मात्र, चेन्नईवर आता पश्चातापाची वेळ आली आहे. या खेळाडूवर 9 कोटी खर्च करणे चांगलेच महागात पडले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर: आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी झालेल्या लिलावात (ipl 2021 auction) अनेक खेळाडूंना त्यांच्या बेस प्राइसपेक्षा अधिक किंमत मिळाली आहे. या यादीमध्ये नेट गोलंदाज कृष्णप्पा गौतम हादेखील आहे. चेन्नई सुपर किंग्जने गौतमला (krishnappa gowtham ) 9 कोटी 25 लाख रुपयांत विकत घेतले. मात्र, चेन्नईवर आता पश्चातापाची वेळ आली आहे. या खेळाडूवर 9 कोटी खर्च करणे चांगलेच महागात पडले आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्सवर (DC vs CSK)) शेवटच्या ओव्हरमध्ये रोमांचक विजय मिळवला आहे. याचसह दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.

शार्दूल ठाकूरच्या मेहनतीवर गौतमने पाणी फिरवले

15 व्या षटकात शार्दूल ठाकूरनं DCला दणके दिले. पहिल्या चेंडूवर त्यानं आर अश्विनला ( २) आणि अखेरच्या चेंडूवर शिखरला ( 39 धावा, 35 चेंडू) बाद करून दिल्लीची अवस्था 6 बाद 99 अशी केली. मात्र, हाताशी आलेला सामना बदली खेळाडूनं गमवला.

IPL 2021 : धोनीच्या नावावर नकोसा विक्रम, आयपीएल इतिहासातली सगळ्यात 'वाईट' बॅटिंग

दिल्लीला तीन षटकांत 28 धावा करायच्या होत्या. तेव्हा धोनीनं त्याचा ट्रम्प कार्ड ड्वेन ब्राव्होला मैदानावर उतरवले. तिसऱ्या चेंडूवर बदली खेळाडू के गौतमने सोपा झेल सोडला अन् हेटमायरला आणखी एक चौकार मिळाला. हा सामन्यातील गेम चेंजींग क्षण ठरला. याच हेटमायरनं 18 चेंडूंत नाबाद 28 धावा करताना दिल्लीचा विजय पक्का केला.

झेल सोडने पडले महागात

सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या 3 षटकांत 4 विकेट शिल्लक असताना विजयासाठी 28 धावा करायच्या होत्या. 18 व्या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूत 6 धावा झाल्या. यादरम्यान हेटमायरनेही एक चौकार लगावला. आता 16 चेंडूत 22 धावा करायच्या होत्या. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हेटमायरने लाँग शॉट खेळला. मात्र, कृष्णाप्पा गौतमला हा सहज झेल घेता आला नाही. एवढेच नाही तर हेटमायरला यावर चौकारही मिळाला. झेल गमावल्यानंतर, हेटमायरने पुढील 7 चेंडूत आणखी 13 धावा केल्या. तो 18 चेंडूत 28 धावांवर नाबाद राहिला. 2 चौकार आणि एक षटकार ठोकला.

18 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर CSKच्या बदली खेळाडूनं केलेली चूक DCच्या पथ्यावर पडली अन् बाजी पलटली. चेन्नईविरुद्धच्या या विजयासोबतच दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. दिल्लीने 13 पैकी 10 सामने जिंकले तर 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. दिल्लीच्या खात्यात सध्या 20 पॉईंट्स आहेत, त्यामुळे आता ते पॉईंट्स टेबलमध्ये टॉप-2 टीममध्ये राहणार हे निश्चित झालं आहे. टॉप-2 मध्ये राहिल्यामुळे दिल्लीला प्ले-ऑफमध्ये दोनदा खेळण्याची संधी मिळणार आहे.

आयपीएल प्ले-ऑफमध्ये आतापर्यंत दिल्ली, चेन्नई आणि आरसीबी क्वालिफाय झाल्या आहेत, तर कोलकाता, राजस्थान आणि मुंबई यांच्यात चौथ्या स्थानासाठी स्पर्धा सुरू आहे.

IPL 2021, CSK vs DC : पंत पडला धोनीवर भारी! दिल्लीचा चेन्नईवर रोमांचक विजय

कृष्णप्पा गौतमवर 9 कोटी खर्च

आयपीएलच्या लिलावात भारतीय संघातील नेट गोलंदाज कृष्णप्पा गौतम(krishnappa gowtham )ला 9  कोटी 25  लाख रुपयांना सीएसकेने विकत घेतले. गौतम फक्त एक गोलंदज नाही तर एक उत्तम अष्टपैलू आहे. विशेष म्हणजे त्याने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. आयपीएलमध्ये अनकॅप्ड खेळाडूला मिळालेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.

First published:

Tags: Csk, Delhi capitals, IPL 2021, Ipl 2021 auction