मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, CSK vs DC : पंत पडला धोनीवर भारी! दिल्लीचा चेन्नईवर रोमांचक विजय

IPL 2021, CSK vs DC : पंत पडला धोनीवर भारी! दिल्लीचा चेन्नईवर रोमांचक विजय

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्सवर (DC vs CSK)) शेवटच्या ओव्हरमध्ये रोमांचक विजय मिळवला आहे. याचसह दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 4 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्सवर (DC vs CSK)) शेवटच्या ओव्हरमध्ये रोमांचक विजय मिळवला आहे. याचसह दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. चेन्नईने दिलेलं 137 रनचं आव्हान दिल्लीने 7 विकेट गमावून 19.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. शेवटच्या 3 बॉलमध्ये दिल्लीला विजयासाठी 2 रनची गरज होती, पण कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) ब्राव्होला (Dwayne Bravo) फोर मारून दिल्लीला जिंकवून दिलं. दिल्लीकडून शिखर धवनने (Shikhar Dhawan) सर्वाधिक 39 रन केल्या, तर शिमरन हेटमायर 28 रनवर नाबाद राहिला. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने 4 ओव्हरमध्ये फक्त 13 रन देऊन 2 विकेट घेतल्या, तर रविंद्र जडेजालाही 2 विकेट घेण्यात यश आलं. दीपक चहर, जॉस हेजलवूड आणि ड्वॅन ब्राव्होला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने टॉस जिंकून चेन्नईला पहिले बॅटिंगला बोलावलं. दिल्लीच्या बॉलरनी त्यांच्या कॅप्टनचा निर्णय योग्य ठरवला. दिल्लीने सुरुवातीपासूनच चेन्नईला धक्के दिले, पण अंबाती रायुडूच्या अर्धशतकामुळे चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 136 रनपर्यंत मजल मारता आली. रायुडूने 43 बॉलमध्ये नाबाद 55 रन केले. दिल्लीकडून अक्सर पटेलला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर नॉर्किया, आवेश खान आणि अश्विनला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

चेन्नईविरुद्धच्या या विजयासोबतच दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. दिल्लीने 13 पैकी 10 सामने जिंकले तर 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. दिल्लीच्या खात्यात सध्या 20 पॉईंट्स आहेत, त्यामुळे आता ते पॉईंट्स टेबलमध्ये टॉप-2 टीममध्ये राहणार हे निश्चित झालं आहे. टॉप-2 मध्ये राहिल्यामुळे दिल्लीला प्ले-ऑफमध्ये दोनदा खेळण्याची संधी मिळणार आहे. आयपीएल प्ले-ऑफमध्ये आतापर्यंत दिल्ली, चेन्नई आणि आरसीबी क्वालिफाय झाल्या आहेत, तर कोलकाता, राजस्थान आणि मुंबई यांच्यात चौथ्या स्थानासाठी स्पर्धा सुरू आहे.

First published:

Tags: Csk, Delhi capitals, IPL 2021