मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : लखपती बॉलर पडतायत बड्या टीमवर भारी, करोडपती मात्र नावालाच 'मोठे'!

IPL 2021 : लखपती बॉलर पडतायत बड्या टीमवर भारी, करोडपती मात्र नावालाच 'मोठे'!

आयपीएल 2021 (IPL 2021) चा मोसम आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. या मोसमात लिलावामध्ये कमी किंमत मिळालेले खेळाडू धमाकेदार कामगिरी करत आहेत.

आयपीएल 2021 (IPL 2021) चा मोसम आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. या मोसमात लिलावामध्ये कमी किंमत मिळालेले खेळाडू धमाकेदार कामगिरी करत आहेत.

आयपीएल 2021 (IPL 2021) चा मोसम आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. या मोसमात लिलावामध्ये कमी किंमत मिळालेले खेळाडू धमाकेदार कामगिरी करत आहेत.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 2 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) चा मोसम आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. या मोसमात लिलावामध्ये कमी किंमत मिळालेले खेळाडू धमाकेदार कामगिरी करत आहेत. आतापर्यंत फक्त 2 बॉलरनाच 20 पेक्षा जास्त विकेट घेता आल्या आहेत आणि या दोन्ही बॉलरची लिलावातली एकूण रक्कमही एक कोटीपेक्षा जास्त नाही. तर 16.25 कोटी रुपयांना विकला गेलेला क्रिस मॉरिस (Chris Morris) फक्त 14 विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे. आरसीबीचा (RCB) हर्षल पटेल (Harshal Patel) आणि दिल्लीचा (Delhi Capitals) आवेश खान (Avesh Khan) हे या मोसमातले सगळ्यात यशस्वी बॉलर आहेत.

आरसीबकडून खेळणाऱ्या हर्षल पटेलने 11 सामन्यांमध्ये सर्वाधिक 26 विकेट घेतल्या आहेत. या मोसमात त्याने हॅट्रिकही घेतली आहे. 27 रन देऊन 5 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसंच त्याने एकदा 4 विकेट आणि एकदा 5 विकेट मिळवल्या आहेत. हर्षलचा इकोनॉमी रेटही 8.57 चा आहे. आरसीबीने हर्षलला 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. बँगलोरने दिल्लीकडून त्याला ट्रान्सफर केलं आहे.

T20 World Cup साठी निवड झालेले भारतीय खेळाडू फ्लॉप, 'स्टॅण्डबाय'नी केला धमाका!

दिल्लीकडून खेळणाऱ्या आवेश खानने 12 मॅचमध्ये 15 च्या सरासरीने 21 विकेट घेतल्या. 13 रन देऊन 3 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आवेश खानचा इकोनॉमी रेटही 7 चा आहे. दिल्लीने 70 लाख रुपयांमध्ये आवेशला विकत घेतलं. शनिवारी मुंबईविरुद्धच्या सामन्यात आवेशने 15 रन देऊन 3 विकेट घेतल्या. 24 वर्षांच्या या फास्ट बॉलरने 39 टी-20 मॅचमध्ये 53 विकेट घेतल्या. यात एकदा 4 आणि एकदा 5 विकेटचा समावेश आहे.

हार्दिकच्या फिटनेसमुळे टीम इंडिया चिंतेत, हा खेळाडू घेईल 'ऑलराऊंडर'ची जागा, गावसकरांना विश्वास

मॉरिस-जेमिसन फेल

दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर क्रिस मॉरिस याला राजस्थानने लिलावात 16.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. मॉरिसने 10 सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या. 23 रनमध्ये 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे, तसंच त्याचा इकोनॉमी रेटही 9.40 रन आहे. तर आरसीबीने फास्ट बॉलर काईल जेमिसनला (Kyle Jamieson) 15 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. या मोसमात जेमिसनने 9 मॅचमध्ये 9 विकेट घेतल्या, त्याचा इकोनॉमी रेटही 9.60 रन आहे.

IPL 2021 : 22 वर्षांच्या फास्ट बॉलरचा सेहवाग झाला फॅन, सांगितलं टीम इंडियाचं 'भविष्य'

First published:

Tags: IPL 2021