• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup साठी निवड झालेले भारतीय खेळाडू फ्लॉप, 'स्टॅण्डबाय'नी केला धमाका!

T20 World Cup साठी निवड झालेले भारतीय खेळाडू फ्लॉप, 'स्टॅण्डबाय'नी केला धमाका!

टी-20 वर्ल्ड कपआधी (T20 World Cup) आयपीएलमध्ये (IPL 2021) काही खेळाडूंच्या कामगिरीने टीम इंडिया (Team India) आणि कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) अडचण वाढवली आहे.

 • Share this:
  दुबई, 2 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपआधी (T20 World Cup) आयपीएलमध्ये (IPL 2021) काही खेळाडूंच्या कामगिरीने टीम इंडिया (Team India) आणि कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) अडचण वाढवली आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) फॉर्ममध्ये नाही, तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) फिटनेसमुळे बॉलिंगही करत नाहीये. तर स्टॅण्डबाय खेळाडू असलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) या दोघांनी धमाकेदार कामगिरी केली आहे. याशिवाय टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड न झालेले शिखर धवन आणि युझवेंद्र चहलदेखील उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम बदलण्यासाठी भारताला 10 ऑक्टोबरपर्यंत परवानगी आहे. इशान किशन टीमबाहेर इशान किशनने आयपीएल 2021 च्या 8 मॅचमध्ये 107 रन केल्या, या कारणामुळे त्याला मुंबईने टीमबाहेर केलं आहे. तर सूर्यकुमार यादवने युएईमध्ये झालेल्या पहिल्या 4 सामन्यांमध्ये फक्त 16 रन केल्या. टी-20 वर्ल्ड कपसाठी भारताने फक्त 6 स्पेशलिस्ट खेळाडूंचा समावेश केला आहे, ज्यात सूर्यकुमार आणि इशान यांचा समावेश आहे. या दोघांच्या फॉर्ममुळे टीम इंडियाला प्लेयिंग इलेव्हन निवडताना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. हार्दिक पांड्यानेही वाढवलं टेन्शन दुसरीकडे हार्दिक पांड्या आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडच्या पहिल्या दोन मॅच खेळला नाही. मुंबईने हार्दिकला फक्त बॅट्समन म्हणून खेळवलं आहे. 2019 साली पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर हार्दिकने एवढी बॉलिंग केलेली नाही. मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या सीरिजमध्ये हार्दिकने बॉलिंग केली होती. हार्दिकशिवाय टीम इंडियात अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा हे दोन ऑलराऊंडर आहेत, पण दोघंही एकाच प्रकारे बॉलिंग आणि बॅटिंग करतात, त्यामुळे दोघांची एकाचवेळी टीममध्ये निवड होणं मुश्कील आहे. अय्यर-शार्दुल फॉर्ममध्ये दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आयपीएल 2021 चा पहिला राऊंड खेळला नव्हता. पण दुसऱ्या राऊंडमध्ये त्याने नाबाद 47 रन, 43 आणि 1 रनची खेळी केली. राजस्थानविरुद्ध अय्यर मॅन ऑफ द मॅचही होता. तर इंग्लंड दौऱ्यात शानदार कामगिरी करणाऱ्या शार्दुल ठाकूरने युएईमध्ये 4 मॅच खेळून 6 विकेट घेतल्या आहेत. शिखर धवन आणि युझवेंद्र चहलची टी-20 वर्ल्ड कपमध्ये निवड न झाल्यामुळे आता प्रश्न निर्माण केले जात आहेत. धवनने या आयपीएलमध्ये 11 मॅचमध्ये 454 रन केले आहेत. या मोसमात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर युझवेंद्र चहलने युएईमध्ये 4 मॅच खेळून 7 विकेट घेतल्या आहेत. 14 ओव्हर बॉलिंग करून त्याने फक्त 78 रन दिल्या. वर्ल्ड कपसाठी राहुल चहरची निवड झाली आहे, पण तोदेखील आयपीएलमध्ये संघर्ष करत आहे. वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी स्टॅण्डबाय खेळाडू श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर
  Published by:Shreyas
  First published: