मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : 22 वर्षांच्या फास्ट बॉलरचा सेहवाग झाला फॅन, सांगितलं टीम इंडियाचं 'भविष्य'

IPL 2021 : 22 वर्षांच्या फास्ट बॉलरचा सेहवाग झाला फॅन, सांगितलं टीम इंडियाचं 'भविष्य'

आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये (IPL 2021) भारताच्या अनेक नवोदितांनी आपली छाप पाडली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागही (Virender Sehwag) भारतीय युवा खेळाडूंची कामगिरी बघून खूश झाला आहे.

आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये (IPL 2021) भारताच्या अनेक नवोदितांनी आपली छाप पाडली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागही (Virender Sehwag) भारतीय युवा खेळाडूंची कामगिरी बघून खूश झाला आहे.

आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये (IPL 2021) भारताच्या अनेक नवोदितांनी आपली छाप पाडली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागही (Virender Sehwag) भारतीय युवा खेळाडूंची कामगिरी बघून खूश झाला आहे.

मुंबई, 2 ऑक्टोबर : आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये (IPL 2021) भारताच्या अनेक नवोदितांनी आपली छाप पाडली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागही (Virender Sehwag) भारतीय युवा खेळाडूंची कामगिरी बघून खूश झाला आहे. या सगळ्या नवोदितांमध्ये सेहवागला पंजाब किंग्सचा (Punjab Kings) फास्ट बॉलर अर्शदीप सिंगची (Arshdeep Singh) कामगिरी आवडली आहे. अर्शदीपने आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 4 सामन्यांमध्ये त्याला 9 विकेट मिळाल्या आहेत. अर्शदीप टॅलेंटेड बॉलर आहे आणि बीसीसीआयने (BCCI) त्याचं टॅलेंट बर्बाद करू नये, असं सेहवाग म्हणाला.

अर्शदीपने आरसीबीविरुद्ध दुबईमध्ये झालेल्या सामन्यात 32 रन देऊन 5 विकेट घेतल्या. या मोसमात 5 विकेट घेणारा अर्शदीप दुसरा बॉलर आहे. याआधी हर्षल पटेलनेही मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 विकेट घेतल्या होत्या.

अर्शदीपने झहीर खानकडून (Zaheer Khan) बॉलिंगचे सल्ले घेतले आणि तीनच दिवसात तो बॉल स्विंग करायला शिकला. अर्शदीप ज्या टीमकडून खेळेल ती टीम फायद्यात असेल, असं वक्तव्य सेहवागने क्रिकबझशी बोलताना केलं.

IPL 2021 : हार्दिकच्या फिटनेसमुळे टीम इंडिया चिंतेत, हा खेळाडू घेईल 'ऑलराऊंडर'ची जागा, गावसकरांना विश्वास

'डावखुऱ्या बॉलरने टाकलेला बॉल ऑफ स्टम्पबाहेर पडून आतमध्ये येतो, अर्शदीपही अशीच बॉलिंग करतोय. त्याने फक्त तीनच दिवस झहीर खानसोबत काम केलं. जर तो एवढ्या कमी वेळेत बॉल स्विंग करायला शिकत असेल, तर तो टीम इंडियासोबत आला तर फायदा होईल. बीसीसीआयने अर्शदीपवर लक्ष ठेवलं पाहिजे, कारण त्याच्यासारखा टॅलेंटेड खेळाडू गमावून चालणार नाही,' अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली.

'अर्शदीप अशीच बॉलिंग करत राहिला तर तो लवकरच भारताकडून खेळू शकतो. तो चांगला बॉलर आहे. तो सध्या ज्या पद्धतीने खेळतो आहे, हे पाहून तो भारताकडून पदार्पण करण्याचा दिवस फार लांब नाही,' असं सेहवागला वाटतं. आयपीएल 2021 मध्ये अर्शदीने 10 मॅचमध्ये 16.56 च्या सरासरीने 16 विकेट घेतल्या आहेत. या मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरच्या यादीत अर्शदीप चौथ्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: IPL 2021, Punjab kings, Virender sehwag