आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे. या हंगामात सर्वात जास्त लक्ष हे युवा खेळाडूंवर असणार आहे.
यावर्षी अंडर-19 संघातून अनेक युवा खेळाडू आयपीएल खेळत आहेत. यातील सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणजे रवी बिश्नोई (ravi bishnoi). रवी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून पहिली आयपीएल स्पर्धा खेळण्यास सज्ज आहे.
मुख्य म्हणजे टीमचे कोच अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रवि इतर संघासाठी धोकादायक ठरू शकतो. याआधी अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये रवीने जबरदस्त कामगिरी केली होती.
बिश्नोईने एका मुलाखतीत अनिल कुंबळेकडून शिकण्याची उत्तम संधी आहे आणि त्याचा उपयोग करण्याची त्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. तो असेही म्हणाला की, कुंबळेकडून बर्याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
युवा गोलंदाज म्हणाला की, कुंबळे सरांनी सामन्याच्या परिस्थितीनुसार गोलंदाजी करण्यास सांगितले. बिश्नोईने कर्णधार केएल एल राहुलचे कौतुक केले आणि सांगितले की तो एक चांगला खेळाडू तसेच एक चांगला कर्णधार आहे.
एवढेच नाही तर रवी बिश्नोईने या वेळी विजेतेपदासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रबळ दावेदार म्हणून निवड केली
अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये त्यानं 17 विकेट घेतल्या होत्या. बिश्नोईला किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) संघाने 2 कोटींना विकत घेतले. त्यामुळे बिश्नोईची गोलंदाजी रोहित-विराटला नक्कीच त्रासदायक ठरेल.