नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी, त्यांनी या हंगामात चांगली कामगिरी केली. याचे श्रेय संघातील सर्वच खेळाडूंनी प्रशिक्षक रिकी पॉटिंगला दिले. मात्र दिल्ली संघाचा फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विननं (Ravichandran Ashwin) आयपीएल सामन्यात पॉटिंग आणि RCBचा कर्णधार विराट कोहली यांच्यात वाद झाल्याचे सांगितले.
आयपीएलच्या या हंगामात RCB आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दोन सामने झाले. यातील एक सामना दिल्लीनं तर एक बॅंगलोरनं जिंकला. दिल्ली आणि बॅंगलोर यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात RCBनं 59 धावांनी विजय मिळवला होता. तर, दुसरा सामना दिल्लीनं 6 विकेटनं जिंकला. मात्र दुसऱ्या सामन्यात विराट आणि पॉटिंगमध्ये एका निर्णयावरून वाद झाल्याचे अश्विननं सांगितले.
वाचा-5 IPL जिंकणाऱ्या रोहितलाच दिग्गज क्रिकेटपटूनं आपल्या IPL संघातून वगळलं!
सामन्यादरम्यान, स्टॅटेजिक टाइम आउटमध्ये विराट ऑन फिल्ड अम्पायरशी काहीतरी बोलत होता, तेव्हा पॉटिंग काही तरी म्हणाला होता. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. मात्र हा वाद जास्त मोठा झाला. पंच आणि खेळाडूंनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. आयपीएल सामन्यानंतर अश्विननं एका कार्यक्रमाच काय घडले होते ते सांगितले.
वाचा-IPL 2020 : या मोसमातले 5 वाद; जी मैदानाबाहेरही गाजली आणि झाली मुबलक चर्चा
अश्विन म्हणाला की विराट आणि त्यांचा संघ या सामन्यात ऑन फिल्ड अम्पायरनं घेतलेल्या निर्णयामुळे खूश नव्हते. अश्विन म्हणाला की, "सामन्यातच माझ्या पाठीत दुखू लागले. गोलंदाजी करून मी मैदानाबाहेर गेले. मात्र यावर RCBने अम्पायरला प्रश्न विचारला सुरुवात केली. त्यानंतर या वादार रिकीही उतरले आणि त्यानंतर विराट आणि त्यांच्यात बाचाबाची झाली".
वाचा-IPL 2020 मध्ये भारताला मिळाले 6 दर्जेदाज युवा खेळाडू
या हंगामात दिल्ली आणि बॅंगलोर दोघांनी प्लेऑफमध्ये जागा मिळवली. मात्र RCBला हैदराबादकडून एलिमिनेटर सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. तर, दिल्लीच्या संघानं क्वालिफायन-1 गमावल्यानंतर क्वालिफायन-2 जिंकून फायनलपर्यंत पोहचले. मात्र यावर्षी त्यांचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न मात्र अर्पूणच राहिले.