मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 मध्ये भारताला मिळाले 6 दर्जेदाज युवा खेळाडू, लवकरच मिळवणार टीम इंडियात जागा

IPL 2020 मध्ये भारताला मिळाले 6 दर्जेदाज युवा खेळाडू, लवकरच मिळवणार टीम इंडियात जागा

आयपीएल (IPL 2020) च्या ग्रुप स्टेजच्या सगळ्या मॅच संपल्यामुळे आता प्ले-ऑफचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बँगलोर या टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या आहेत. लीग स्टेजमध्ये दिग्गजांपेक्षा युवा खेळाडूंच्या कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधले.

आयपीएल (IPL 2020) च्या ग्रुप स्टेजच्या सगळ्या मॅच संपल्यामुळे आता प्ले-ऑफचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बँगलोर या टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या आहेत. लीग स्टेजमध्ये दिग्गजांपेक्षा युवा खेळाडूंच्या कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधले.

या 6 युवा खेळाडूंनी जिंकलं दिग्गजांचं मन, IPLमुळे उघडली टीम इंडियाची दारं.

    नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : आयपीएलचा (IPL 2020) तेरावा हंगाम आता संपला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा IPL टी-20 क्रिकेट स्पर्धा 2020 मध्ये अनेक नवीन आणि युवा खेळाडू झळकले. एकीकडे यावर्षी सामन्यांमध्ये वाईट कामगिरीमुळे अनेक दिग्गजांनी फॅन्सना निराश केले होते, तर दुसरीकडे युवा खेळाडूंनी स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या खेळाडूंनी फक्त त्यांच्या खेळामुळे आपली मनं जिंकली नाहीत तर भारतीय क्रिकेट संघातून खेळण्याइतकं धाडस त्यांच्यात आहे हेही दाखवलं. IPL टी-20 क्रिकेट स्पर्धा 2020 मध्ये या 6 युवा खेळाडूंनी सर्वांना खूपच प्रभावित केलं आहे. जाणून घ्या कोण आहेत हे युवा खेळाडू : 1. ईशान किशन (मुंबई इंडियन्स) : ईशान किशन गेल्या तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्ससाठी खेळतो. बिहारच्या किशननं अंडर-19 विकेटकीपर-फलंदाज म्हणून आपली प्रतिमा तयार केली होती. त्याला मुंबई इंडियन्सकडून सतत संधी मिळाल्या नाहीत, विशेषत: क्विंटन डॅकॉक टीममध्ये आल्यानंतर. 2020 मध्ये सौरभ तिवारी जखमी झाल्यानंतर किशनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध संधी मिळाली. त्याने ही संधी साधून दमदार 99 धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये मुंबईनं तो सामना गमावला, मात्र धावांचा पाठलाग करताना किशनने जो ट्रेंड दाखवला तो सर्वांनाच भावला. त्यानंतर किशन हा मुंबई इंडियन्सचा अविभाज्य घटक झाला. 2. देवदत्त पडिक्कल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू): ऑस्ट्रेलियाचा ओपनर अ‍ॅरॉन फिंच याला 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून संघात घेण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. नेहमीचे ओपनर पार्थिव पटेलच्या जागी आरसीबीने फिंच सोबत देवदत्त पाडिक्कल याला ती जागा दिली. देवदत्तने आरसीबीच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या. तो आरसीबीचा मजबूत आधारस्तंभ म्हणून पुढे आला. पडिक्कलने 15 सामन्यांत 31.53 च्या सरासरीने आणि 124.80 च्या स्ट्राइक रेटने 473 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 अर्धशतकंही केली. 3. प्रियम गर्ग (सनरायझर्स हैदराबाद): भारताचा अंडर-19 कर्णधार, 19 वर्षीय प्रियम गर्गला हैदराबादकडून फलंदाजीच्या कमी संधी मिळाल्या. त्याने बॉटम ऑर्डरमध्ये फलंदाजी केली, मात्र त्यानं जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्याचं सोनं केलं. एका सामन्यात हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 69 धावा करून 4 गडी गमावले होते. या वेळी प्रियम गर्गने 26 चेंडूंत 51 धावांची खेळी करत संघाला 164 धावांचा उभ्या करून दिल्या. त्याच्या शांत आणि संयमी खेळीतून हे सिद्ध झाले की तो मोठ्या इनिंग्ज खेळू शकतो. प्रियमने IPL टी20 क्रिकेट स्पर्धा 2020 मध्ये 14 सामन्यांत 14.77 च्या सरासरीने आणि 119.81 च्या स्ट्राइक रेटने 133 धावा केल्या. 4. अब्दुल समद (सनरायझर्स हैदराबाद): जम्मू-काश्मीरचा ऑल राऊंडर अब्दुल समद खूप प्रतिभावान आहे. माजी भारतीय ऑल राउंडर इरफान पठाणनं त्याला प्रशिक्षण दिले आहे. पठाण हा जम्मू-काश्मीरचा मेंटॉर होता. समदला मुथय्या मुरलीधरननं संघात निवडले. समदला मिळालेल्या मर्यादित संधींमध्येही त्याने संघाला निराश केलं नाही. दुबईतील अबूधाबीच्या मैदानात सीमेपलीकडे तो किती सहजपणे चेंडू पोहोचवू शकतो हे समदने दाखवून दिले. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने आपली परिपक्वता आणि प्रतिभा दाखवली. इरफान पठाण, युवराज सिंग आणि ब्रायन लारा यासारख्या दिग्गजांनी समदचं कौतुक केलं आहे. 19 वर्षीय समदने IPL टी-20 क्रिकेट स्पर्धा 2020 मध्ये 12 सामने खेळले आणि 22.20 च्या सरासरीने 111 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 170.76 होता. या सिझनमध्ये त्याने आठ चौकार आणि सहा षटकार मारले. 5. रवी बिश्नोइ (किंग्ज इलेव्हन पंजाब): भारतीय अंडर-19 क्रिकेट संघातून सापडलेला आणखी एक स्टार म्हणजे लेगस्पिनर रवी बिश्नोइ. पंजाबने मुजीब उर रहमानपेक्षा त्याच्यावर अधिक विश्वास दाखवला आणि बिश्नोईने संघाला अजिबात निराश केले नाही. बिश्नोइने आरसीबीविरुद्ध तीन गडी बाद करून आपले कौशल्य दाखवले. या सामन्यात पंजाबने 97 धावांनी मोठा विजय मिळवला. बिश्नोइ अजूनही पंजाबचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याकडून गोलंदाजीच्या ट्रिक्स शिकत आहे, बिश्नोइने IPL टी-20 क्रिकेट स्पर्धा 2020 च्या 14 सामन्यात 7.37 च्या इकॉनॉमीसह 12 विकेट्स घेतल्या आहेत. 6. कमलेश नागरकोटी (कोलकाता नाईट रायडर्स): उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी 2018 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघात दाखल झाला, पण दोन सिझनमध्ये दुखापतीमुळे त्याला एकही सामना खेळता आला नाही. यावर्षी त्याला युएईमध्ये IPL टी-20 क्रिकेट स्पर्धा 2020 मध्ये संधी मिळाली. नागरकोटीने केकेआरचा विश्वास सार्थ ठरवला. दुखापतीतून सावरण्याची पूर्ण संधीही त्याला मिळाली. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने विनिंग स्पेल टाकला आणि जोफ्रा आर्चरचा कठीण कॅच देखील पकडला. आशा आहेत की, केकेआर सोबत पुढे त्याचे भविष्य उज्ज्वल होईल. नागरकोटीने IPL टी-20 क्रिकेट स्पर्धा 2020 च्या 10 सामन्यांत 8.88 च्या इकॉनॉमीसह 5 विकेट्स घेतल्या आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या