मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2020 : या मोसमातले 5 वाद; जी मैदानाबाहेरही गाजली आणि झाली मुबलक चर्चा

IPL 2020 : या मोसमातले 5 वाद; जी मैदानाबाहेरही गाजली आणि झाली मुबलक चर्चा

दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेतही (IPL 2020) काही वाद झाले.  काही मैदानावर तर काही मैदानाबाहेर. विराट कोहली, अनुष्का शर्मा, धोनी आणि गावस्कर यांच्याभोवतीचे वाद जास्त गाजले.यापैकी 5 विषय विशेष गाजले.

दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेतही (IPL 2020) काही वाद झाले. काही मैदानावर तर काही मैदानाबाहेर. विराट कोहली, अनुष्का शर्मा, धोनी आणि गावस्कर यांच्याभोवतीचे वाद जास्त गाजले.यापैकी 5 विषय विशेष गाजले.

दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेतही (IPL 2020) काही वाद झाले. काही मैदानावर तर काही मैदानाबाहेर. विराट कोहली, अनुष्का शर्मा, धोनी आणि गावस्कर यांच्याभोवतीचे वाद जास्त गाजले.यापैकी 5 विषय विशेष गाजले.

    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : कोरोना साथीमुळे (Coronavirus) यंदा आयपीएल टी-20 (IPL 2020) क्रिकेट स्पर्धा UAE मध्ये झाली. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI Vs DC) दिल्ली कॅपिटल्सवर 5 गडी राखून विजय मिळवत आयपीएल विजेतेपद (IPL 2020 winner) पाचव्यांदा पटकावलं. दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेतही काही वाद झाले. काही मैदानावर तर काही मैदानाबाहेर. यापैकी 5 विषय विशेष गाजले. 13 व्या आयपीएल मोसमात झालेल्या पाच मोठ्या वादांवर एक नजर टाकू या:

    दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब शॉर्ट रन वाद :

    स्पर्धेतील पहिल्याच दिल्लीविरुद्ध पंजाब सामना टाय झाला. टीव्ही फुटेजमध्ये दिसलं की ख्रिस जॉर्डननी रबाडाच्या 19 व्या षटकात एक रन पूर्ण काढली नव्हती. पहिली रन काढताना जॉर्डननी क्रिझमध्ये बॅट टेकवली नव्हती असं टीव्ही फुटेजमध्ये दिसलं त्यामुळे एक शॉर्ट रन धरण्यात आली आणि त्यामुळे मयंक अग्रवाल आणि पंजाबच्या धावसंख्येत एकच रन वाढवण्यात आली. पंजाबला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावा हव्या असताना मयंकनी पहिल्या तीन चेंडूंवर 12 धावा काढल्या. जर एक कमी पडली नसती तर पंजाबनी तीन चेंडू राखून सामना जिंकला असता. पण शेवटच्या दोन बॉलवर त्यांच्या दोन विकेट पडल्यामुळे मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली आणि ती दिल्लीने जिंकली. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सहवागनेही यावर टीका केली.

    टॉम कुर्रनला बाद दिल्यानंतर अंपायरनी परत बोलवलं :

    राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सामन्यातल्या 18 व्या षटकात टॉम कुर्रनला मैदानातील अंपायर शम्सुद्दीन यांनी एलबीडब्ल्यू आउट दिलं. कुर्रननी रिव्ह्यू घेतला. पण राजस्थानकडे रिव्ह्यू राहिलाच नव्हता. पण अंपायरनी चर्चा केली चेन्नईचा कर्णधार धोनीनीही आक्षेप घेतला. नंतर कॅचसाठी रिव्ह्यू घेतला गेला. तिसऱ्या अंपायरनी व्हिडिओत पाहून सांगितलं की चेंडू बॅटला लागला नव्हता. त्यामुळे एलबीडब्ल्यूचा निर्णय बदलून कुर्रनला पुन्हा फलंदाजीला बोलवण्यात आलं.

    अनुष्का शर्मानं सुनील गावस्करांना सुनावलं:

    किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीनी दोन कॅच सोडले. फलंदाजी करताना फक्त 5 धावा केल्या. याबद्दल बोलताना महान फलंदाज कॉमेंट्रेटर सुनील गावस्कर यांनी विराट आणि त्याची बायको अनुष्काच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वक्तव्य केलं. हे विधान आक्षेपार्ह होतं त्यामुळे अनुष्काने ट्विटरवर गावस्करांना सुनावलं की, ‘ मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमचं वक्तव्य चुकीचं होतं. तुम्ही अशी वक्तव्य का करता ? क्रिकेटरच्या मैदानातील कामगिरीसाठी त्याची बायकोच जबाबदार आहे का, तुम्ही क्रिकेटरच्या खासगी जीवनाबद्दल आदर बाळगला आहे हे मी जाणते मग तुम्हाला असं वाटत नाही का की माझ्याबद्दलही तुम्ही तसंच वागलं पाहिजे. मला क्रिकेटच्या विषयात जबरदस्तीने आणणं कधी थांबणार? ’ त्यानंतर गावस्करांनी स्पष्टीकरण देताना त्यांच्या वाक्याचा वेगळा अर्थ घेतला गेल्याचं सांगितलं.

    पॉल रेफल यांनी वाइडचा निर्णय बदलला:

    चेन्नईविरुद्ध हैदराबाद सामान्यातील दुसऱ्या डावातील 19 व्या षटकात हैदराबाद खेळत असताना अंपायर पॉल रेफल यांनी शार्दुल ठाकुरने टाकलेला चेंडू वाइड दिला. चेन्नईचा कर्णधार धोनीने विरोध दर्शवल्यावर रेफलना आपला निर्णय बदलावा लागला. सनराइजर्स हैदराबादनी 168 रनचा पाठलाग करत सहज सामना जिंकला.

    डीआरएस वर वाद:

    एलिमिनेटर सामन्यात रॉयल चैलेंजर्स बेंगलोरविरुद्ध हैदराबाद सामन्यात डेव्हिड वॉर्नरला डीआरएसच्या मदतीने बाद देण्यात आलं. कॉमेंट्रेटरसह सर्वांनीच हा निर्णय चूक होता असं म्हटलं. मोहम्मद सिराजच्या सहाव्या ओव्हरमध्ये वॉर्नरचा विकेटच्या मागे कॅच घेतला होता. मैदानातील अंपायरने नॉट आउट दिला पण विराटनी रिव्ह्यू घेतल्यावर लक्षात आलं की चेंडू वॉर्नरच्या ग्लोजला लागून यष्टिरक्षकाने झेल घेतला होता. या निर्णयाने क्रिकेट पंडित आणि कॉमेंट्रेटर चकित झाले. कॉमेंट्रेटर म्हणाले, मला वाटतं अंपायरचा निर्णय चुकीचा आहे. बेनिफिट ऑफ डाउट फलंदाजाला मिळायला हवा होता असं अनेकांना वाटलं.

    First published:

    Tags: IPL 2020, Virat anushka