Home /News /sport /

IPL 2020: हे 4 रेकॉर्ड रचण्यासाठी 'हिट'मॅन सज्ज, पूर्ण करणार षटकारांचे द्विशतक

IPL 2020: हे 4 रेकॉर्ड रचण्यासाठी 'हिट'मॅन सज्ज, पूर्ण करणार षटकारांचे द्विशतक

आयपीएलचे (IPL 2020) हे वर्ष देखील खास असणार आहे. याही वर्षी काही रेकॉर्ड बनतील तर काही जुने रेकॉर्ड तोडण्यात येतील. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा देखील काही रेकॉर्ड्स त्याच्या नावे करून घेण्यासाठी सज्ज आहे.

    मुंबई, 16 सप्टेंबर : आयपीएल (IPL 2020) ची प्रतीक्षा आता अवघ्या काही दिवसात संपणार आहे. सर्वात जास्त लांबणीवर पडलेला आयपीएलचा यंदाचा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी पहिल्याच दिवशी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज भिडणार आहेत. युएईमध्ये अबूधाबी याठिकाणी हा सामना रंगणार असून दोन्ही टीम या लढतीसाठी सज्ज आहेत. दरम्यान यावेळीही सर्वांच्या नजरा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मावर (Rohit Sharma) खिळून राहणार आहेत. कारण सुरुवातीच्या काही सामान्यांमध्येच रोहित शर्मा 4 रेकॉर्ड त्याच्या नावावर करण्याची शक्यता आहे. त्याचा परफॉरमन्स कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माकडे पाहिले जाते. कारण त्याने कर्णधार म्हणून त्याने 7 हंगाम खेळले आहेत आणि त्यापैकी 4 सीझनमध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. (हे वाचा-IPL 2020 : या सीझनमध्ये मयंती लँगरला टक्कर देणार ही ऑस्ट्रेलियन अँकर) दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा(Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आहे. धोनीने आतापर्यंत कर्णधार म्हणून 10 हंगाम खेळले आहेत आणि त्यापैकी 3 वेळा त्याच्या टीमने विजय मिळवला आहे. आयपीएलच्या एका हंगामात धोनी रायजिंग पुणे सुपरजायंटचा देखील कर्णधार होता, मात्र टीमने विशेष यश मिळवले नव्हते. हिटमॅन रचणार हे 4 रेकॉर्ड्स आयपीएलचे हे वर्ष देखील खास असणार आहे. याही वर्षी काही रेकॉर्ड बनतील तर काही जुने रेकॉर्ड तोडण्यात येतील. सुरुवातीच्या काही मॅचमध्येच काही रेकॉर्ड रचण्याचा रोहितचा मानस राहिल. रोहित शर्माने जर 102 धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण करणारा तिसरा खेळाडू ठरेल. याआधी हा टप्पा सुरेश रैना आणि विराट कोहलीने पूर्ण केला आहे. (हे वाचा-मुंबई इंडियन्सकडून खेळणार अर्जून तेंडुलकर? 'त्या' फोटोमुळे चाहत्यांमध्ये चर्चा) रोहित शर्माने केलेल्या काही रन्स मुंबई इंडियन्ससाठी देखील रेकॉर्ड ठरणार आहेत. 2020 च्या या सीझनमध्ये रोहित जेव्हा त्याची 272 वी रन पूर्ण करेल तेव्हा तो मुंबई इंडियन्ससाठी 4000 रन करणारा पहिला खेळाडू ठरेल. त्याचप्रमाणे रोहितने या हंगामात 7 षटकार मारले तर तो मुंबई इंडियन्ससाठी 150 षटकार मारणाराही पहिला खेळाडू ठरेल. आणखी एक रेकॉर्ड रोहितच्या नावावर या हंगामात होईल, तो म्हणजे त्याने जर 6 षटकार मारले तर आयपीएलमध्ये 200 षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचेही नाव जोडले जाईल. याआधी क्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि एमएस धोनी यांनी हा टप्पा पूर्ण केला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Rohit sharma

    पुढील बातम्या