स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020: मुंबई इंडियन्सकडून खेळणार अर्जून तेंडुलकर? 'त्या' फोटोमुळे चाहत्यांमध्ये चर्चा

IPL 2020: मुंबई इंडियन्सकडून खेळणार अर्जून तेंडुलकर? 'त्या' फोटोमुळे चाहत्यांमध्ये चर्चा

चेन्नईला हरवण्यासाठी रोहित शर्मानं अर्जूनला केलं संघात सामिल? फोटोमुळे चाहते संभ्रमात.

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला 4 दिवसांनी सुरुवात होत आहे. 19 सप्टेंबर रोजी पहिलाच सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) यांच्यात होणार आहे. चारवेळा आयपीएल चॅम्पियन असणाऱ्या रोहित शर्माचा संग पाचव्यांदा आयपीएल जिंकण्यास सज्ज आहे. यासाठी खेळाडूंनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यातच संपूर्ण संघ युएइमध्ये दाखल झाला. मात्र मुंबई संघाच्या एका फोटोमुळे चाहते संभ्रमात आहे. या फोटोमध्ये मुंबईच्या खेळाडूंसोबत पूलमध्ये सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) दिसला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अर्जून मुंबईकडून खेळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

वाचा-6 वर्षांआधी सुशांतच्या सिनेमात होता हिरो, आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार IPL

या फोटोनंतर अर्जून मुंबई संघात सामिल झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अर्जून संघात नाही तर नेट बॉलर म्हणून संघात सामिल झाला आहे. कारण नियमांनुसार, कोणताही संघ नवीन खेळाडू संघात सामिल करू शकत नाही, जोपर्यंत खेळाडू संघाबाहेर होत नाही. त्यामुळ अर्जूनला नेट बॉलर म्हणून संघात घेतले आहेत. अर्जून मुंबईच्या फलंदाजांना गोलंदाजी करताना दिसेल.

वाचा-IPLच्या इतिहासातले 8 जबरदस्त कॅच, तुम्हाला हैराण करणारे हे क्षण पुन्हा पाहाच!

वाचा-मुंबई, चेन्नई नाही तर 'हा' संघ होणार IPL 2020 चॅम्पियन! दिग्गज खेळाडूने सांगितले

टीम इंडियासाठीही अर्जून करायचा नेट बॉलिंग

याआधीही अर्जून मुंबई संघाच्या नेट सेशनमध्ये दिसला होता. 20 वर्षीय अर्जूननं याआधी भारतीय संघासाठीही नेटमध्ये बॉलिंग केली आहे. इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज गोलंदाजांना अर्जून गोलंदाजी करायचा. तर, 2017 महिला वर्ल्ड कप फायनलमध्येही नेटमध्ये गोलंदाजी करताना अर्जून दिसला होता. अर्जून एक ऑलराउंडर खेळाडू असून रणजीमध्ये तो मुंबई संघाकडून खेळतो.

Published by: Priyanka Gawde
First published: September 15, 2020, 11:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading