अबु धाबी, 26 ऑक्टोबर : बेन स्टोक्स (Ben Stokes)च्या शतकामुळे राजस्थान (Rajasthan Royals)ने मुंबई (Mumbai Indians)चा 8 विकेटने पराभव केला आहे. या सामन्यात विजय मिळत राजस्थाननं प्ले ऑफसाठी आव्हान कायम ठेवलं आहे. या सामन्यात संजू सॅमसन आणि बेन स्टोक्स यांनी जबरदस्त कामगिरी केली. मात्र जोफ्रा आर्चरनं (Jofra Archer) घेतलेला एक कॅच चर्चेचा विषय ठरला. नेहमी आपल्या गोलंदाजीनं सर्वांना हैराण करणाऱ्या आर्चरनं यावेळी शानदार फिल्डिंग केली. मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या या सामन्यात 11व्या ओव्हरमध्ये मुंबईला 90 धावांवर इशान किशानच्या रुपानं दुसरा झटका बसला. कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर इशान आऊट झाला खरा मात्र याचे खरे श्रेय जाते जोफ्रा आर्चरला. जोफ्रा आर्चरने थर्ड मॅनला हवेत उडी मारत जबरदस्त कॅच घेतला, हा खरतर सिक्स होता, मात्र आर्चरनं जबरदस्त कॅच घेतला. वाचा- IPL 2020 : राजस्थानच्या विजयामुळे चेन्नईचं स्वप्न भंगलं, प्ले-ऑफचा मार्ग बंद 11व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर इशान मोठा शॉट खेळायला गेला. गोलंदाज कार्तिक त्यागीसह संघातील सर्व खेळाडूंना हा सिक्स जाणरा असेच दिसत होता. त्यातच थर्ड मॅनला उभ्या असलेल्या आर्चरनं हवेत उडी मारत एका हातानं कॅच घेतला. या कॅचसह इशान किशान 36 चेंडूत 37 धावा करत बाद झाला. आर्चरनं घेतलेला हा कॅच पाहून रियान पराग आणि गोलंदाज कार्तिक त्यांनी यांनी तोंडावर हात ठेवला. कोणलाचा विश्वास बसला नाही की आर्चरनं असा जबरदस्त कॅच घेतला. वाचा- IPL 2020 : आयपीएलच्या 8 टीमकडून खेळला तरी चमकला नाही, यंदाही संघर्ष सुरूच
Expressions galore as @JofraArcher takes a blinder 😯😯#Dream11IPL pic.twitter.com/j0Xb9TSJ0g
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
मुंबईने ठेवलेल्या 196 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 44 रनवर 2 विकेट गमावल्या, पण यानंतर स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी नाबाद 152 रनची पार्टनरशीप केली. स्टोक्सने 60 बॉलमध्ये नाबाद 102 केले. स्टोक्सच्या या खेळीमध्ये 14 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता, तर संजू सॅमसनने 31 बॉलमध्ये नाबाद 54 रन केले. संजू सॅमसनने 4 फोर आणि 3 सिक्स लगावले. मुंबईकडून जेम्स पॅटिनसनलाच दोन्ही विकेट मिळाल्या. वाचा- IPL 2020 : आयपीएलच्या प्ले-ऑफ आणि फायनलच्या वेळापत्रकाची घोषणा मुंबईविरुद्धच्या या विजयासोबतच राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. राजस्थानने 12 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मुंबईने 11 पैकी 7 मॅचमध्ये विजय मिळवला असून 4 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.