IPL 2020 : आयपीएलच्या प्ले-ऑफ आणि फायनलच्या वेळापत्रकाची घोषणा

IPL 2020 : आयपीएलच्या प्ले-ऑफ आणि फायनलच्या वेळापत्रकाची घोषणा

आयपीएल (IPL 2020) च्या प्ले-ऑफ आणि फायनलच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.

  • Share this:

दुबई, 25 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या प्ले-ऑफ आणि फायनलच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबरला दुबईमध्ये आयपीएलची फायनल खेळवली जाईल, तर पहिली क्वालिफायर 5 नोव्हेंबरला याच स्टेडियममध्ये होईल. तर अबु धाबीमध्ये 6 नोव्हेंबरला एलिमिनेटर आणि 8 नोव्हेंबरला क्वालिफायर-2 ची मॅच होईल.

बीसीसीआयने रविवारी आयपीएलच्या प्ले-ऑफ आणि फायनलचं वेळापत्रक घोषित केलं. आयपीएल फायनलसाठी बीसीसीआय सगळ्या राज्य संघांच्या एका सदस्याला आमंत्रण देणार आहे. राज्य संघाचे सगळे प्रतिनिधी आयपीएलसाठी युएईला जाणार आहेत, यासाठी त्यांना कमीत कमी तीन कोरोना टेस्ट कराव्या लागणार आहेत. यातल्या दोन टेस्ट भारतात तर शेवटची दुबईमध्ये होईल. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना आयपीएल फायनल बघता येणार आहे.

5 नोव्हेंबर- पहिल्या क्रमांकाची टीम विरुद्ध दुसऱ्या क्रमांकाची टीम (क्वालिफायर-1) - दुबई

6 नोव्हेंबर- तिसऱ्या क्रमांकाची टीम विरुद्ध चौथ्या क्रमांकाची टीम (एलिमिनेटर)- अबु धाबी

8 नोव्हेंबर- क्वालिफायर-1 मध्ये पराभूत झालेली टीम विरुद्ध एलिमिनेटर जिंकलेली टीम (क्वालिफायर-2) - अबु धाबी

10 नोव्हेंबर- फायनल- क्वालिफायर-1 जिंकलेली टीम विरुद्ध क्वालिफायर-2 जिंकलेली टीम

महिला टी-20 चॅलेंज वेळापत्रक

4 नोव्हेंबर- सुपरनोव्हाज विरुद्ध व्हेलॉसिटी- शारजाह, संध्याकाळी 7.30 वाजता

5 नोव्हेंबर- व्हेलॉसिटी विरुद्ध ट्रेलब्लेजर्स- शारजाह, संध्याकाळी 7.30 वाजता

7 नोव्हेंबर- ट्रेलब्लेजर्स विरुद्ध सुपरनोव्हाज- शारजाह, संध्याकाळी 7.30 वाजता

9 नोव्हेंबर- फायनल, शारजाह, संध्याकाळी 7.30 वाजता

महिला टी-20 च्या 3 टीमचं नेतृत्व हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि मिताली राज यांच्याकडे असेल. या स्पर्धेत भारताशिवाय इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या क्रिकेटपटू सहभागी होतील.

Published by: Shreyas
First published: October 25, 2020, 10:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या