IPL 2020 : राजस्थानच्या विजयामुळे चेन्नईचं स्वप्न भंगलं, प्ले-ऑफचा मार्ग बंद

IPL 2020 : राजस्थानच्या विजयामुळे चेन्नईचं स्वप्न भंगलं, प्ले-ऑफचा मार्ग बंद

राजस्थान (Rajasthan Royals)ने मुंबई (Mumbai Indians)चा पराभव करत चेन्नई (CSK)चा प्ले-ऑफमध्ये खेळण्याचा दरवाजा बंद केला आहे.

  • Share this:

अबु धाबी, 25 ऑक्टोबर : राजस्थान (Rajasthan Royals)ने मुंबई (Mumbai Indians)चा पराभव करत चेन्नई (CSK)चा प्ले-ऑफमध्ये खेळण्याचा दरवाजा बंद केला आहे. यामुळे चेन्नई ही प्ले-ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे. चेन्नईच्या या मोसमातल्या अजून 2 मॅच बाकी असल्या तरी आता त्यांना प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळणार नाही.

आयपीएलच्या इतिहासात चेन्नई पहिल्यांदाच प्ले-ऑफमध्ये दिसणार नाही. आतापर्यंत चेन्नईने खेळलेल्या सगळ्या आयपीएलच्या मोसमात ते प्ले-ऑफला पोहोचले होते. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नईच्या टीमवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ही दोन वर्ष वगळता आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये पहिल्या वर्षापासून चेन्नईची टीम प्रत्येक वर्षी होती.

यंदाच्या मोसमात चेन्नईची कामगिरी निराशाजनक झाली. आतापर्यंत खेळलेल्या 12 मॅचपैकी 4 मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला असून 8 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. पॉईंट्स टेबलमध्ये सध्या चेन्नईची टीम शेवटच्या म्हणजेच 8व्या क्रमांकावर आहे.

अशी आहे पॉईंट्स टेबलची अवस्था

पॉईंट्स टेबलमध्ये सध्या मुंबई, दिल्ली आणि बँगलोर या टीम पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या तिन्ही टीमनी त्यांच्या 11 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पण फक्त नेट रनरेटमुळे या तिन्ही टीमच्या क्रमांकामध्ये फरक आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर कोलकात्याची टीम आहे. कोलकात्याने या मोसमात खेळलेल्या 11 मॅचपैकी 6 मॅचमध्ये विजय मिळवला, तर 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांच्या खात्यात सध्या 12 पॉईंट्स आहेत.

दुसरीकडे पंजाबच्या टीमने 11 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 6 मॅच गमावल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब पाचव्या क्रमांकावर आहे. तर राजस्थानने 12 मॅचपैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवला आणि 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. राजस्थानची टीम सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबादने या मोसमात 11 पैकी 4 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. हैदराबादच्या खात्यात सध्या 8 पॉईंट्स आहेत.

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात 16 पॉईंट्सवर टीम प्ले-ऑफला प्रवेश मिळवतात, तर 14 पॉईंट्सवर प्ले-ऑफ गाठणाऱ्या टीमचं गणित नेट रनरेटवर अवलंबून असतं. त्यामुळे सध्याचं पॉईंट्स टेबल बघितलं तर मुंबई, दिल्ली आणि बँगलोर प्ले-ऑफमध्ये पोहोचतील, असंच चित्र आहे. तर चौथ्या टीमसाठी कोलकाता, पंजाब, राजस्थान आणि हैदराबाद यांच्यामध्ये स्पर्धा आहे.

Published by: Shreyas
First published: October 25, 2020, 11:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या