मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : आयपीएलच्या 8 टीमकडून खेळला तरी चमकला नाही, यंदाही संघर्ष सुरूच

IPL 2020 : आयपीएलच्या 8 टीमकडून खेळला तरी चमकला नाही, यंदाही संघर्ष सुरूच

आयपीएल (IPL 2020)चा यंदाचा मोसम आता शेवटाकडे येऊ लागला आहे, पण अजूनही प्ले-ऑफच्या टीम निश्चित झाल्या नाहीत. तरी मुंबई, दिल्ली आणि बँगलोरची टीम प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल, असं सध्याच्या त्यांच्या कामगिरीवरुन दिसत आहे.

    दुबई, 26 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)चा यंदाचा मोसम आता शेवटाकडे येऊ लागला आहे, पण अजूनही प्ले-ऑफच्या टीम निश्चित झाल्या नाहीत. तरी मुंबई, दिल्ली आणि बँगलोरची टीम प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल, असं सध्याच्या त्यांच्या कामगिरीवरुन दिसत आहे. बऱ्याच कालावधीनंतर बँगलोर (RCB) ने या मोसमात दिमाखदार कामगिरी केली आहे, पण त्यांचा ओपनर एरॉन फिंच (Aron Finch) याला वारंवार संधी देऊनही अपयश येत आहे. चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्येही एरॉन फिंच 15 रन करुन आऊट झाला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात बँगलोरने फिंचला मोठ्या अपेक्षेने विकत घेतलं होतं. बँगलोरने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असलेल्या फिंचवर 4.40 कोटी रुपयांची बोली लावली होती. पण फिंचला मात्र त्याला मिळालेल्या रकमेच्या साजेशी खेळी करता आली नाही. या मोसमात त्याने 21.45 च्या सरासरीने आणि 111 च्या स्ट्राईक रेटने 236 रन केले आहेत. या मोसमात 11 मॅच खेळल्यानंतर फिंचला फक्त 1 अर्धशतक करता आलं. फिंचच्या तंत्रामध्येही दोष असल्याचं दिसत आहे. या मोसमात त्याला इन स्विंग बॉलिंगपुढे अनेक अडचणी आल्या. यानंतर फिंचने त्याच्या बॅटिंग स्टाईलमध्येही बदल केले, पण तरीही त्याच्या पदरी निराशा आली. त्यामुळे आता पुढच्या काही मॅचमध्ये विराट फिंचच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या खेळाडूला संधी देऊ शकतो. 8 टीमकडून खेळला फिंच ऍरोन फिंचने याचवर्षी आयपीएलच्या 8 टीमकडून खेळण्याचा विक्रमही नोंदवला आहे, पण प्रत्येक टीमकडून खेळताना त्याला संघर्षच करावा लागला आहे. 2011 साली फिंच राजस्थानच्या टीममध्ये, 2012 साली दिल्लीसोबत, 2013 साली पुण्याच्या टीममध्ये, 2014 साली हैदराबाद, 2015 साली मुंबई, 2016 आणि 2017 साली पुण्याच्या टीममध्ये होता. यानंतर 2018 साली तो पंजाबसोबत जोडला गेला, पण 2019 साली वर्ल्ड कपच्या तयारीसाठी त्याने आयपीएलमधून माघार घेतली. कोलकाता आणि चेन्नईची टीम सोडता फिंच आयपीएलच्या सगळ्या टीमकडून खेळला आहे. फिंचने आयपीएलच्या 86 मॅचमध्ये 25.29च्या सरासरीने आणि 128.12 च्या स्ट्राईक रेटने 1973 रन केल्या आहेत, यामध्ये 14 अर्धशतकांचा समावेश आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या