मुंबई, 04 मार्च : क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ समजला जातो. आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये तुफान फटकेबाजी चालते. यात अनेक अफलातुन फटके बघायला मिळतात. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर शॉट आजही चकीत करून टाकणारा आहे. अनेकांनी आजपर्यंत त्याच्या या शॉटची कॉपी केली. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका फलंदाजाने मारलेल्या शॉटचं कौतुक केलं जात आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ कधीचा आणि कोणत्या ठिकाणचा आहे याची माहिती मिळालेली नाही. मात्र यामध्ये फलंदाज चेंडू वेगळ्याच प्रकारे टोलावतो. दोन्ही पायांच्या मधून बॅक साइडला जोरदार फटका मारल्याच या व्हिडिओमध्ये दिसत आहे. असा शॉट कोणताही फलंदाज मारू शकणार नाही असं व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरनं म्हटलं आहे.
हा शाॅट कोणी मारुन दाखवावा 👌🏻 pic.twitter.com/BcZOtEQVA7
— अभिजीत औताडे (@abhiautade) March 3, 2020
व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणी असा फटका मारलाय का असंही विचारण्यात आलं आहे.
Not. .. cz impossible with speed130 +
— Umesh Lokare (@UmeshLokare) March 4, 2020
एका युजरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या वेगानं गोलंदाजी होते त्यावर असा फटका खेळणं शक्य नाही असं म्हटलं आहे. हेलिकॉप्टर शॉटपेक्षा हा शॉट खतरनाक असल्याचं एका युजरनं म्हटलं आहे. हे वाचा : विराटच्या चुकीमुळे संपणार फलंदाजाचे करिअर, कोहलीवर भडकला माजी क्रिकेटपटू