कोलकाता, 20 नोव्हेंबर : पुढच्या वर्षी जगातल्या सर्वात महागड्या अशा आयपीएल लीगचा तेरावा हंगाम होणार आहे. यासाठी सर्व आठ संघांनी जय्यत तयारी करण्यास सुरुवात केली आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. त्याआधी कोणता संघ कोणावर बोली लावणार यावरून स्पर्धा सुरू झाली आहे.
दरम्यान, आता आयपीएलच्या लिलावाआधी एका दिग्गज खेळाडूवर आधीच बोली लावण्याची तयारी एका संघानं दाखवली आहे. याआधी सिक्सर किंग आणि दिग्गज फलंदाज युवराज सिंग आयपीएल खेळणार नसल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता युवीवर बोली लावण्यासाठी एक संघ तयार झाला आहे. बाराव्या हंगामात युवराज सिंगला 1 कोटी रुपयांना मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतले होते. मात्र येत्या हंगामासाठी युवीला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या हंगामात युवीला फक्त चार सामने खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र 13व्या हंगामाआधीच युवीला रिलीज करण्याचा निर्णय घेतला.
वाचा-युवी तू काय केलंस! 'त्या' एका चुकीमुळे IPLमध्ये सिक्सर किंगला मुकणार चाहते
आता तेराव्या हंगामात कोलकाता संघानं युवीला आपल्या संघात घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. केकेआर संघाचा सीईओनं याबाबत ट्विरवर खुलासा केला आहे. लिलावाआधीच कोलाकातच्या संघाने युवीवर बोली लावली आहे. केकेआरचा सीईओ वेंकी मैसुर यांनी एक ट्वीट करत, “युवराज सिंग, आम्ही ख्रिस लीनला रिलीज करण्याचा निर्णय यासाठी घेतला कारण आम्हाला लिलावात तुझ्यावर बोली लावायची होती. दोन्ही चॅम्पियन खेळाडूंना खुप प्रेम आणि सन्मान”, असे ट्वीट केले आहे.
Loading...@YUVSTRONG12 we released @lynny50 so that we could bid for you! 😜 Love and respect for both of you champions! #IPL2020 #KKR #Legends #Sixhitters @KKRiders
— Venky Mysore (@VenkyMysore) November 19, 2019
वाचा-धोनीला रिलीज करणार का? सूत्रांच्या माहितीवर CSK ने दिलं ऑफिशिअल उत्तर
आयपीएलच्या लिलावाआधी आठही संघांनी आपल्या संघातील खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करण्याचा निर्णय घेतला. यासाठी केकेआरनं ऑस्ट्रेलियाचा तुफानी फलंदाज ख्रिस लिनला संघाबाहेर केले. लिनला रिलीज केल्यानंतर दुसऱ्याचदिवशी त्यानं टी-10 लीगमध्ये 91 धावांची तुफानी खेळी केली. दरम्यान याच खेळाडूला रिलीज करण्याचा निर्णय युवराजसाठी घेतला आहे की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
युवी लिलावातून होणार बाहेर?
युवराज सिंगचे नाव आयपीएल 2020च्या लिलावात तांत्रिक कारणामुळे सामिल होऊ शकलेले नाही. खरतर युवी हा विदेशी लीगमध्ये खेळत असल्यामुळे बीसीसीआयच्या नियमानुसार तो भारतीय लीगमध्ये खेळू शकणार नाही आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार संन्यास घेतलेल्या खेळाडूंना भारतीय लीगमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही. त्यामुळं त्याला आता आयपीएलमधूनही संन्यास घ्यावा लागणार आहे. याच नियमाचा फटका युवराज सिंगला बसणार आहे. युवी सध्या टी-10 लीगमध्ये मराठा अरेबियन संघाकडून खेळत आहे. याआधी युवी कॅनडामध्ये झालेल्या टी-20 लीगमध्ये खेळत होता.
वाचा-KKR वर पश्चातापाची वेळ, 9.6 कोटी मोजलेल्या खेळाडूला संघाबाहेर काढलं आणि...
आयपीएलमध्ये वेगळ्या भुमिकेत दिसणार युवी?
जर युवीनं विदेशी लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला नसता तर त्याला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली असती. त्यामुळे आता लिलावात युवीला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. गेल्या वर्षी युवीला बेस प्राईजवर विकत घेण्यात आले होते. त्यामुळं यंदाच्या हंगामात युवी वेगळ्या भुमिकेत दिसू शकतो. यावेळी आयपीएलमध्ये युवी क्रिकेट एक्सपर्ट किंवा समालोचन करताना दिसेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा