नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी फक्त मैदानावर असणंच संघासाठी महत्त्वाचं ठरतं. मग तो भारतीय संघात असेल किंवा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज असो. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर धोनी आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीची चर्चा वारंवार होत असते. तुर्तास तरी धोनी निवृत्ती घेणार नसल्याचं स्पष्ट आहे. इतकंच नाही तर तो आयपीएलमध्येही पुढच्या हंगामात चेन्नईकडून खेळणार आहे. महेंद्र सिंग धोनीने वर्ल़्ड कपनंतर क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलेलं नाही. यातच आता आयपीएळच्या लिलावाची चर्चा सुरू असताना खेळाडूंची अदला बदली केली जात आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे. यात लिहिलं आहे की ट्रान्सफर विंडो बंद होण्याच्या शेवटच्या दिवशी संघ पाच खेळाडूंना रिलीज करणार आहे. यात एका चाहत्याने म्हटलं की, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई सुपर किंग्ज महेंद्रसिंग धोनीला रिलीज करण्याच्या तयारीत आहे. आता चेन्नई सुपर किंग्जने धोनीला बाय बाय करण्याची वेळ आली आहे.
As per Close Sources, @ChennaiIPL #CSK planning to drop MSD tomorrow! Might be very well his way of saying "Goodbye Chennai".😉
— Mahi (@mahiban4u) November 14, 2019
चेन्नई सुपरकिंग्जने या चाहत्याच्या पोस्टला प्रतिक्रियासुद्धा पटकन दिली. यावर मजेशीर उत्तर देताना म्हटलं की, आता सूत्रांना बाय बाय म्हणण्याची वेळ आली आहे.
आयपीएलमध्ये चेन्नईने तीनवेळा विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नईने पाच खेळाडूंना रिलीज केलं असून 20 खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे. यामध्ये चैतन्य बिश्नोई, ध्रुव शौरी, मोहित शर्मा, डेविड विली, सॅम बिलिंग्स यांचा समावेश आहे. VIDEO: पॉल अॅडम्सचे 2019 मधील व्हर्जन; गोलंदाजी पाहून तुम्ही व्हाल हैराण KKR वर पश्चातापाची वेळ, 9.6 कोटी मोजलेल्या खेळाडूला संघाबाहेर काढलं आणि…

)







