मुंबई, 18 नोव्हेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या या हंगामासाठी आठही संघ सध्या जय्यत तयारी करत आहेत. यासाठी सर्व संघांनी रिलीज आणि रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच मुंबई इंडियन्स संघानं सिक्सर किंग युवराज सिंगला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आयपीएलमध्ये युवी खेळताना दिसणार की नाही याबाबत साशंकता आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी डिसेंबरमध्ये लिलाव होणार आहे. दरम्यान, आता युवी देशातील सर्वात मोठी लीग असलेल्या आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे वृत्त आहे. युवीला या स्पर्धेत त्याच्याच एका चुकीमुळे मुकावे लागणार आहे. त्यामुळं आता मुंबई इंडियन्सनं रिलीज केल्यानंतरही आता युवीचा समावेश लिलावात होणार नाही. वाचा- धोनीला रिलीज करणार का? सूत्रांच्या माहितीवर CSK ने दिलं ऑफिशिअल उत्तर मुंबईनं घेतला युवीला रिलीज करण्याचा निर्णय मागच्या हंगामात युवराज सिंगला 1 कोटी रुपयांना मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतले होते. मात्र येत्या हंगामासाठी युवीला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या हंगामात युवीला फक्त चार सामने खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र 13व्या हंगामाआधीच युवीला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एका तांत्रिक कारणामुळे युवी आयपीएलच्या लिलावात सामिल होऊ शकणार नाही आहे. वाचा- KKR वर पश्चातापाची वेळ, 9.6 कोटी मोजलेल्या खेळाडूला संघाबाहेर काढलं आणि… या कारणामुळे आयपीएल 2020च्या बाहेर झाला युवी युवराज सिंगचे नाव आयपीएल 2020च्या लिलावात तांत्रिक कारणामुळे सामिल होऊ शकलेले नाही. खरतर युवी हा विदेशी लीगमध्ये खेळत असल्यामुळे बीसीसीआयच्या नियमानुसार तो भारतीय लीगमध्ये खेळू शकणार नाही आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार संन्यास घेतलेल्या खेळाडूंना भारतीय लीगमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही. त्यामुळं त्याला आता आयपीएलमधूनही संन्यास घ्यावा लागणार आहे. याच नियमाचा फटका युवराज सिंगला बसणार आहे. युवी सध्या टी-10 लीगमध्ये मराठा अरेबियन संघाकडून खेळत आहे. याआधी युवी कॅनडामध्ये झालेल्या टी-20 लीगमध्ये खेळत होता. वाचा- मिशन IPL 2020! रोहितसाठी धोक्याची घंटा, संघातील स्टार खेळाडू अजूनही जखमी आयपीएलमध्ये वेग्ळ्या भुमिकेत दिसणार युवी? जर युवीनं विदेशी लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला नसता तर त्याला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली असती. त्यामुळे आता लिलावात युवीला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. गेल्या वर्षी युवीला बेस प्राईजवर विकत घेण्यात आले होते. त्यामुळं यंदाच्या हंगामात युवी वेगळ्या भुमिकेत दिसू शकतो. यावेळी आयपीएलमध्ये युवी क्रिकेट एक्सपर्ट किंवा समालोचन करताना दिसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







