नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामाला (IPL 2020) 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. यामुळे आता सर्व संघांची आपला सराव आणखी तीव्र केला आहे. त्याचबरोबर संघ बांधणीकडेही लक्ष दिले जात आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitlas) संघानेही तयारीला सुरुवात केली आहे. संघाचे कोच रिकी पॉन्टिंग सध्या प्लेइंग इलेव्हनबाबत चिंतेत आहेत. पॉन्टिंग सध्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), आर अश्विन (R. Ashwin) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) यांना संघात स्थान न देण्याच्या विचारात आहे. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या लिलावात अश्विन (किंग्ज इलेव्हन पंजाब) आणि रहाणे (राजस्थान रॉयल्स) यांना आपल्या संघात घेतले. या खेळाडूंना विकत घेण्यामागे संघाची रणनीती फिरोजशाह कोटला मैदानावर आधारित होती. मात्र कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा युएइमध्ये खेळवण्यात येणार आहे. दिल्ली संघात आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा आहे. त्याचबरोबर संघात पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिखर धवन यांसारखे जबरदस्त फलंदाज तर, सर्वात जास्त विकेट घेणारा अमित मिश्रा, अक्षर पटेल यांसारखे गोलंदाजही आहेत. त्यामुळे 11 खेळाडूंमध्ये अजिंक्य रहाणे, अश्विन आणि इशांत शर्मा यांना जागा देणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. वाचा- लिलावात सर्व संघांनी नाकारलेल्या ‘या’ युवा गोलंदाजाला CSKने घेतलं विकत अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळू शकते संधी दिल्ली कॅपिटल्सचा संघ 20 सप्टेंबरपासून किंग्ज इलेव्हनपंजाब विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात अश्विनला खेळण्याची संधी मिळू शकते. पॉवरप्लेमध्ये अश्विनला खेळवणे संघासाठी फायद्याचे असेल. अश्विनचा अनुभव गोलंदाजीसाठी फायद्याची ठरू शकते. त्यामुळे अय्यर आणि युवा खेळाडूंसाठी अश्विन, अमित मिश्रा यांचा अनुभव फायद्याचा ठरेल. वाचा- दिग्गजांवर भारी पडणार 20 लाखांना विकत घेतलेला जम्मू-काश्मीरचा ‘हा’ युवा खेळाडू! अजिंक्य रहाणेला मिळणार नाही जागा? रहाणे भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये राजस्थान संघाचा कर्णधार राहिला आहे. रहाणेचा आयपीएलमधला स्ट्राइक रेट 120पेक्षा कमी आहे. त्यामुळे सलामीला किंवा तिसऱ्या क्रमांकावर रहाणेला संधी दिली जाऊ शकते. मात्र दिल्ली संघाकडे धवन आणि शॉच्या रुपाने आधाची सलामी जोडी आहे. त्यात बदल केले जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जर रहाणेला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरवल्यास कर्णधार अय्यर आणि ऋषभ पंत यांना चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल. वाचा- …म्हणून पाणीपुरी विकणाऱ्या खेळाडूला राजस्थान संघाने 2.40 कोटींना विकत घेतलं अशी असेल प्लेइंग इलेव्हन संघाकडून सहाव्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरोन हेटमायर फलंदाजी करू शकतो. तर, सातव्य क्रमांकासाठी दोन अष्टपैलू खेळाडू आहेत. किमो पॉल आणि मार्कस स्टोइनिस. तर संघात तीन गोलंदाज असतील. यात अश्विन आणि अमित मिश्रा यांचे स्थान पक्के असेल. तर कागिसो रबाडा आणि इशांत शर्मा या दोन जलद गोलंदाजांना संघात संधी मिळू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.