‘तेव्हा वाटलं माझं आयुष्यच संपलं’, कॅप्टन कोहलीनं सांगितला करिअरमधला कटू प्रसंग

‘तेव्हा वाटलं माझं आयुष्यच संपलं’, कॅप्टन कोहलीनं सांगितला करिअरमधला कटू प्रसंग

क्रिकेटमध्ये सध्या पहिल्यांदाच खेळाडूंच्या मानसिक स्वाथ्यावर बोलले जात आहे.

  • Share this:

इंदूर, 13 नोव्हेंबर : क्रिकेटमध्ये सध्या पहिल्यांदाच खेळाडूंच्या मानसिक स्वाथ्यावर बोलले जात आहे. या विषयाला खरी सुरुवात झाली ती, ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलनं मानसिक स्वाथ्य ठिक नसल्यामुळं क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर सर्वच क्रिकेट बोर्डांनी खेळाडूंच्या मानसिक स्वाथ्याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. याबाबत आता भारताचा कर्णधार विराट कोहलीनं मोठा खुलासा केला आहे.

एलीट क्रिकेटमध्ये ग्लेन मॅक्सवेलच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णयानंतर खेळाडूंना असलेला मानसिक तणाव सर्वांसमोर आला. मॅक्सवेलनंतर ऑस्ट्रेलियाच्याच आणखी एक खेळाडूनं हा निर्णय घेतला. मॅडिनसन असे या खेळाडूचे नाव हे. याचबरोबर इंग्लंडचे स्टीव हार्मिसन, मार्कस ट्रॅस्कोथिक, ग्रीम फाऊलर या खेळाडूंनीही या एका कारणामुळं क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान , आता भारत-बांगलादेश यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याआधी विराटनं आपल्या मानसिक तणावाबाबत खुलासा केला.

वाचा-4 दिवस, 3 गोलंदाज आणि 4 हॅट्रिक! एका क्लिकवर पाहा क्रिकेटमधले हे सुवर्णक्षण

‘2014मध्ये माझे करिअर संपल्यात जमा होते’

बांगलादेश विरोधात पहिल्या कसोटी सामन्याआधी विराटनं, “2014मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. तो दौरा माझ्यासाठी वाईट ठरला, त्यावेळी मला माझे करिअर संपल्यात जमा आहे असे वाटत होते. मला माहित नव्हते काय करू. कसे बोलावे, कोणाशी बोलावे. काहीच कळत नव्हते”, असे सांगितले. 2014च्या या दौऱ्यातच विराट करिअरमधल्या सर्वात फॉर्ममध्ये होता. एकाही सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता न आल्यानं त्याला संघातून बाहेर काढण्याची मागणी जोर धरत होती. त्यावर पहिल्यांदाच विराटनं आपले मत व्यक्त केले. तसेच पत्रकारांना संबोधित करताना विराटनं, “तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला एक नोकरी आहे. ती टिकवण्यासाठी तुम्ही काम करता. आमची पण एक नोकरी आहे,पण आमच्यावर संपूर्ण देशाचा दबाव असतो. त्यामुळं या नोकरीत दुसऱ्याच्या मनातले समजून घेणे कठिण असते”, असेही सांगितले.

वाचा-मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन...! भारताच्या क्रिकेटपटूचा दावा

विराटनं मानले मॅक्सवेलचे आभार

मॅक्सवेलनं विश्रांती घेण्याबाबत विराटला विचारले असता त्याने, “मॅक्सवेलनं जगभरातल्या क्रिकेटपटूंसाठी एक उदाहरण ठेवले आहे. जर तुम्ही फ्रेश नसाल आणि मानसिक स्थाथ्य तुमच्या शाररिक स्वाथ्याएवढेच महत्त्वाचे आहे. मॅक्सवेलच्या निर्णयाचा मला अभिमान आहे”, असे मत व्यक्त केले. विराट कोहली आणि मॅक्सवेल आयपीएलमध्ये एकत्र क्रिकेट खेळले आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर दोघंही एकमेकांविरोधात खेळतात.

Published by: Priyanka Gawde
First published: November 13, 2019, 5:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या