स्पोर्ट्स

  • associate partner

धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार विराट आणि रोहित! ‘या’ दिवशी मुंबईत होणार सामना

धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार विराट आणि रोहित! ‘या’ दिवशी मुंबईत होणार सामना

IPLमध्ये धोनी, रोहित आणि विराट एकाच टीममध्ये खेळणार! गांगुलीचा मास्टर प्लॅन

  • Share this:

मुंबई, 17 जानेवारी : आयपीएलच्या तेराव्या हंगामाची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे. दरम्यान बीसीसीआयच्या वतीने आयपीएलच्या या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळं तेराव्या हंगामाचा शुभारंभ हा हायवोल्टेज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्यात होणार आहे. आईपीएल 2020ची सुरुवात भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेनंतर 11 दिवसांनी होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 29 मार्चला होईल तर अंतिम सामना 17 मे रोजी खेळवला जाणार आहे.

मात्र आयपीएलआधी चाहत्यांसाठी एक वेगळी पर्वणी पाहायला मिळणार आहे. यात आता 8 संघांमधील खेळाडू एकाच वेळी एकाच सामन्यात मैदानात उतरतील असा विचार केला आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच होईल जेव्हा या स्पर्धेपूर्वी चॅरिटी सामना आयोजित केला जाईल. आयपीएल चॅरिटी सामना 25 मार्च रोजी झालेल्या आयपीएल सामन्याच्या 3 दिवस आधी खेळला जाऊ शकतो, ज्यामध्ये सर्व दिग्गज एकत्र दिसणार आहे. यात धोनीच्या नेतृत्वाखाली विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळताना दिसणार आहे.

वाचा-IPLआधीच मुंबई इंडियन्सने KKR आणि CSKला टाकलं मागे, रचला अनोखा रेकॉर्ड

असा आहे BCCIचा प्लॅन

मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय आणि आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलने या चॅरिटी सामन्यासाठी दोन संघ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यात एक संघ उत्तर आणि पूर्व भारत असेल तर दुसर संघ दक्षिण आणि पश्चिम भारत असेल. त्यामुळं एका संघात दिल्ली कॅपिटल्स, किंग्स इलेवन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट राइडर्सचे खेळाडू असतील. तर, दुसऱ्या संघात चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियंस, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनराइजर्स हैदराबादचे खेळाडू असतील. ईएसपीएन क्रिकइंफोने दिलेल्या माहितीनुसार हा मास्टर प्लॅन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा आहे.

वाचा-IPLच्या पहिल्याच सामन्यात फायनलसारखा थरार! मुंबई पुन्हा चॅम्पियन होण्यास सज्ज

धोनी, विराट आणि रोहित एकाच संघातून खेळणार

या ऑल स्टार क्रिकेट संघात दिग्गज खेळाडू एकत्र खेळताना दिसतील. त्यामुळं या सामन्यांमध्ये विराट कोहली, एमएस धोनी, रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स, जसप्रीत बुमराह, शेन वॉटसन, हरभजन सिंग आणि लसिथ मलिंगासारखे दिग्गज एकत्र खेळताना दिसतील.

वाचा-थाला इज बॅक! 8 महिन्यांनंतर ‘या’ संघाविरुद्ध धोनी खेळणार पहिला सामना

50 दिवस चालणार आयपीएल

क्रिकबजनं दिलेल्या माहितीनुसार, या हंगामातील सामना 29 मार्च ते 17 मे दरम्यान खेळले जातील. आयपीएलचा 12वा हंगाम 44 दिवस चालला होता, तर तेरावा हंगाम 50 दिवस चालणार आहे. या हंगामाचा लीग स्टेजमधील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. दरम्यान नॉकआऊट स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. राजस्थान रॉयल्स वगळता इतर सर्व संघाचे सामने त्यांच्या घरच्या मैदानावर होतील. तर राजस्थान संघाचे सामने गुवाहटी येथे होणार आहेत.

First published: February 17, 2020, 9:35 AM IST

ताज्या बातम्या