मुंबई, 16 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 13व्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएल 2020चा पहिला सामना चारवेळा चॅम्पियन झालेला संघ मुंबई इंडियन्स आणि तीनवेळा विजेतेपद जिंकलेला संघ चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मार्च शेवटच्या आठवड्यात सुरू होणार्या आयपीएल 2020च्या लीग स्टेज सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासह मुंबई इंडियन्स संघाने आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे.
वाचा- IPLच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या कोणात होणार पहिला सामना? रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा गतविजेता आयपीएल संघ, मुंबई इंडियन्स सातव्यांदा आयपीएलचा उद्घाटन सामना खेळणार आहे. आयपीएलच्या तेरा वर्षांच्या इतिहासातला हा एक विक्रम आहे. आत्तापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील सर्वाधिक उद्घाटन सामने खेळण्याच्या यादीत 6-6 सामने खेळून प्रथम क्रमांकावर होते. मात्र नव्या वेळापत्रकानुसार मुंबई इंडियन्सने कोलकाताला मागे टाकले आहे. धोनीच्या CSK संघाने खेळले आहेत सर्वात जास्त फायनल तर, आयपीएलमध्ये सर्वात जास्त फायनल सामने खेळण्याचा विक्रम हा चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या नावावर आहे. सीएसके संघाने आतापर्यंत तब्बल 8 वेळा फायनलमध्ये जागा मिळवली आहे. यात 5 वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर, तीनवेळा त्यांना विजेतेपद पटकावता आले आले. मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 5 वेळा अंतिम सामने खेळले आहेत. 4 वेळा त्यांना आयपीएलचे विजेतेपद पटकावता आले आहे. वाचा- थाला इज बॅक! 8 महिन्यांनंतर ‘या’ संघाविरुद्ध धोनी खेळणार पहिला सामना सगळ्यात जास्त उद्घाटन सामना खेळणारे संघ 7 - मुंबई इंडियन्स* 6 - चेन्नई सुपर किंग्स* 6 - कोलकाता नाइट राइडर्स 3 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 1 - डेक्कन चार्जेस 1 - दिल्ली डेअरडेविल्स 1 - रायजिंग पुणे सुपरजायंट 1 - सनरायजर्स हैदराबाद वाचा- IPLच्या पहिल्याच सामन्यात फायनलसारखा थरार! मुंबई पुन्हा चॅम्पियन होण्यास सज्ज या संघांनी एकदाही पटकावले नाही विजेतेपद आयपीएल 2020मध्ये एकूण 8 संघ भाग घेत आहेत. यातील तीन संघ असे आहेत, ज्यांना एकदाही विजेतेपद पटकावला आलेले नाही. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा समावेश आहे.

)







