स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 : थाला इज बॅक! 8 महिन्यांनंतर ‘या’ संघाविरुद्ध धोनी खेळणार पहिला सामना

IPL 2020 : थाला इज बॅक! 8 महिन्यांनंतर ‘या’ संघाविरुद्ध धोनी खेळणार पहिला सामना

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या कमबॅककडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धोनीनं जुलै 2019नंतर एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या कमबॅककडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धोनीनं जुलै 2019नंतर एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. मात्र आता धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे कारण धोनीच्या पुनरागमनाची तारीख जाहीर झाली आहे. धोनी आता वर्ल्ड कप 2019नंतर थेट आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळताना दिसणार आहे. धोनीच्या CSK (चेन्नई सुपरकिंग्ज) संघाचे तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

बीसीसीआयनं शनिवारी आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. यातील पहिलाचा सामना हा हायवोल्टेज होणार आहे, कारण हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. या सामन्यात धोनी चेन्नई संघाचा कर्णधार म्हणून तब्बल आठ महिन्यांनी मैदानात उतरले.

वाचा-IPLच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या कोणात होणार पहिला सामना?

चेन्नई चेन्नई सुपर किंग्जसंघाचा कर्णधार धोनी

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी 29 मार्च रोजी 8 वाजता वानखेडे मैदानावर सामना होईल.याआधी धोनी कोणता सामना खेळेले याची शक्यता कमी आहे. धोनीनं अखेरचा सामना 10 जुलै 2019मध्ये खेळला होता. आता 8 महिन्यांनंतर 29 मार्च 2020 रोजी धोनी मैदानात उतरेल. दरम्यान धोनीचे टीम इंडियात कमबॅक हे त्याच्या आयपीएलमधील फॉर्मवर अवलंबून असेल. आयपीएलनंतर भारत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे तयारी करेल.

वाचा-भारताचा स्टार कॉमेंटेटर खेळणार IPL! धोनीला पुन्हा चॅम्पियन करून घेणार निवृत्ती

असे असतील चेन्नईचे सामने

29 मार्च- मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्ज

2 एप्रिल- राजस्थान रॉयल्स vs चेन्नई सुपर किंग्ज

6 एप्रिल-कोलकाता नाईट रायडर्स vs चेन्नई सुपर किंग्ज

11 एप्रिल-किंग्ज इलेव्हन पंजाब vs चेन्नई सुपर किंग्ज

17 एप्रिल- किंग्ज इलेव्हन पंजाब vs चेन्नई सुपर किंग्ज

19 एप्रिल- सनरायजर्स हैदराबाद vs चेन्नई सुपर किंग्ज

24 एप्रिल- मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्ज

27 एप्रिल- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs चेन्नई सुपर किंग्ज

4 मे- राजस्थान रॉयल्स vs चेचेन्नई सुपर किंग्ज

7 मे- कोलकाता नाईट रायडर्स vs चेन्नई सुपर किंग्ज

10 मे- दिल्ली कॅपिटल्स vs चेन्नई सुपर किंग्ज

14 मे- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs चेन्नई सुपर किंग्ज

वाचा-अखेर झाली धोनीच्या कमबॅकची घोषणा, CSKने शेअर केला खास VIDEO

50 दिवस चालणार आयपीएल

क्रिकबजनं दिलेल्या माहितीनुसार, या हंगामातील सामना 29 मार्च ते 17 मे दरम्यान खेळले जातील. आयपीएलचा 12वा हंगाम 44 दिवस चालला होता, तर तेरावा हंगाम 50 दिवस चालणार आहे. या हंगामाचा लीग स्टेजमधील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. दरम्यान नॉकआऊट स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. राजस्थान रॉयल्स वगळता इतर सर्व संघाचे सामने त्यांच्या घरच्या मैदानावर होतील. तर राजस्थान संघाचे सामने गुवाहटी येथे होणार आहेत.

First published: February 16, 2020, 9:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading