नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : भारतीय संघ बांगलादेश विरोधात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. सध्या इंदूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे आयपीएलच्या 13व्या हंगामाची जय्यत तयारी सर्व संघ करत आहेत. आयपीएलचा 13वा हंगाम सुरू होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना डिसेंबरमध्ये IPL 2020साठी लिलाव होणार आहे. दरम्यान त्याआधी आयपीएलच्या लिलावासाठी ऑफ सीझन ट्रेड विंडो ही 14 नोव्हेंबरपर्यंत खुली राहणार आहे. त्यामुळं कोणत्या खेळाडूंना ठेवणार किंवा रिलीज करता येणार यासाठी एका दिवसाचा कालावधी उरला आहे. दरम्यान, भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेना आयपीएलमध्ये मोठा फटका बसला आहे. गेली 9 वर्ष रहाणे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होता. मात्र या संघानं रहाणेला रीलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आयपीएल 2020मध्ये रहाणे दुसऱ्याच संघासोबत खेळताना दिसणार आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणे आता आयपीएलमध्ये दिल्लीकर होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. वाचा- IPL 2020साठी मुंबई इंडियन्स सज्ज, रोहितला मिळणार ‘या’ चॅम्पियन खेळाडूची साथ! अजिंक्य रहाणेची सध्याची किंमत 4 कोटी रुपये आहे. त्यामुळं रहाणेच्या जागी राजस्थान रॉयल्स संघाला दोन खेळाडू मिळणार आहेत. रहाणेबाबत गेले काही महिने निर्णय घेतला जात होता. त्यामुळं कोणता संघ रहाणेला आपल्या संघात घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दिल्ली कॅपिटल्सच्या संघामध्ये सध्या शिखर धवन, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी यांसारखे शानदार खेळाडू आहे. दरम्यान गेल्या हंगामात दिल्ली संघानं चांगली कामगिरी केली होती. तर राजस्थान संघाची कामगिरी निराशाजनक होती, यातच रहाणेकडून कर्णधारपदही काढून घेण्यात आले होते. वाचा- धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जनं घेतला मोठा निर्णय, या 3 स्टार खेळाडूंना दिला डच्चू रहाणे 2011पासून राजस्थान संघासोबत आहे. 2018मध्ये रहाणे या संघाचा कर्णधार झाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तुलनेत रहाणेचा आयपीएलमधला रेकॉर्ड जास्त चांगला आहे. रहाणेनं आयपीएलमध्ये 122च्या स्ट्राईक रेटनं 9 हजार 820 धावा केल्या आहेत. आता दिल्लीशी जोडल्यानंतर रहाणे रिकी पॉंटिंग आणि प्रवीण आम्रे यांच्यासोबत काम करेल. वाचा- इंदूरमध्ये भारताचाच दबदबा! कॅप्टन कोहलीला अनोख्या विक्रमाची संधी आयपीएलच्या लिलावात संघाकडे आहेत इतके पैसे दिल्ली कॅपिटल्स – 7.7 कोटी राजस्थान रॉयल्स – 7.15 कोटी रुपये कोलकाता नाइट राइडर्स – 6.05 कोटी रुपये सनराइजर्स हैदराबाद – 5.30 कोटी रुपये किंग्स इलेवन पंजाब – 3.7 कोटी रुपये मुंबई इंडियन्स – 3.55 कोटी रुपये चेन्नई सुपर किंग्स – 3.2 कोटी रुपये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 1.80 कोटी रुपये
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







