पांड्याने राहुलसाठी घेतली 10 लाखांची 'कॉफी', त्या फोटोनंतर चर्चेला उधाण

पांड्याने राहुलसाठी घेतली 10 लाखांची 'कॉफी', त्या फोटोनंतर चर्चेला उधाण

हार्दिक पांड्या आणि केएल राहुल हे दोघेही कॉफी विथ करण कार्यक्रमातील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर वादात अडकले होते. आता पुन्हा त्या घटनेची पुन्हा चर्चा होत आहे.

  • Share this:

मुंबई, 15 मे : कॉफी विथ करण कार्यक्रमामुळे वादात अडकलेला भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. आयपीएलच्या 12 व्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचे चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं. त्यांनी चेन्नईला फक्त एका धावेनं पराभूत केलं.

आयपीएलमध्ये अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सच्या कामगिरीत मोलाचं योगदान दिलं. तर किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज केएल राहुलला मोस्ट स्टायलिश प्लेअरचा पुरस्कार मिळाला. ट्रॉफीसह केएल राहुलला 10 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं.

आय़पीएलच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केएल राहुल उपस्थित नव्हता. त्याच्यावतीने हार्दिक पांड्याने पुरस्कार स्वीकारला. यानंतर सोशल मीडियार पुन्हा एकदा कॉफी विथ करणची चर्चा सुरु झाली. अनेकांनी हार्दिक पांड्याला केएल राहुलचा कॉफी दोस्त म्हटलं आहे. एका युजरने हार्दिक पांड्याने केएल राहुलसाठी दहा लाखांची कॉफी घेतली असं म्हटलं आहे. याशिवाय अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

हार्दिक पांड्या आणि केएल राहुल हे दोघेही कॉफी विथ करण कार्यक्रमामुळे वादात अडकले होते. या कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याने दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पांड्या आणि राहुल यांनी विनाशर्त माफी मागितल्यानंतर बीसीसीआयने त्यांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचा दंड केला.

VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2019 11:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading