मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Womens Asia Cup: मलेशियाविरुद्ध टीम इंडियाची 'मॅच प्रॅक्टिस', आशिया कपमध्ये केला हा नवा रेकॉर्ड

Womens Asia Cup: मलेशियाविरुद्ध टीम इंडियाची 'मॅच प्रॅक्टिस', आशिया कपमध्ये केला हा नवा रेकॉर्ड

मेघना आणि शफाली वर्मा

मेघना आणि शफाली वर्मा

Womens Asia Cup: भारतीय संघासाठी हा सामना 'प्रॅक्टिस मॅच' या स्वरुपाचाच होता. पण तरीही भारताच्या इतर फलंदाजांनी वुमन्स आशिया कपमध्ये एक मोठा विक्रम प्रस्थापित केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

सिल्हेत-बांगलादेश, 03 ऑक्टोबर: महिलांच्या आशिया कप स्पर्धेत भारतीय संघानं शनिवारी श्रीलंकेला हरवून दण्याक्यात सुरुवात केली. आज स्पर्धेच्या दुसऱ्या साखळी सामन्यात भारताची गाठ पडली ती मलेशियाशी. या सामन्यातही टीम इंडियानं डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे 30 धावांनी विजय मिळवला. दरम्यान मलेशियासारख्या नवख्या संघाविरुद्ध हरमनप्रीत कौर आणि भारतीय संघव्यवस्थापनानं संघात काही बदल केले. स्मृती मानधनाला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली. तर स्वत: हरमनप्रीत कौर आणि गेल्या मॅचची मॅन ऑफ द मॅच जेमिमा रॉड्रिग्स बॅटिंगसाठी मैदानाच उतरलेच नाही. एकूणच भारतीय संघासाठी हा सामना 'प्रॅक्टिस मॅच' या स्वरुपाचाच होता. पण तरीही भारताच्या इतर फलंदाजांनी वुमन्स आशिया कपमध्ये एक मोठा विक्रम प्रस्थापित केला.

शफाली-मेघनाची शतकी सलामी

भारताविरुद्ध मलेशियाची गोलंदाजी साधारण वाटली. कारण पहिल्या विकेटसाठी मलेशियाला तब्बल 14व्या ओव्हरपर्यंत वाट पाहावी लागली. मेघना आणि शफालीनं आक्रमक सुरुवात करताना भारताला 116 धावांची सलामी दिली. मेघना 69 धावा काढून बाद झाली. तर शफालीनं 39 बॉल्समध्ये 46 धावांचं योगदान दिलं. या दोघी बाद झाल्यानंतर विकेट किपर रिचा घोषनं फटकेबाजी करताना 19 बॉल्समध्ये नाबाद 33 धावा ठोकल्या. त्यामुळे भारतानं 20 ओव्हरमध्ये 181 धावांचा डोंगर उभा केला. आशिया कपमध्ये टी20 फॉरमॅटमधली आजवरची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

हेही वाचा - Ind vs SA T20: गुवाहाटीत विराटनं जिंकली मनं... त्या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहा किंग कोहलीनं काय केलं?

मेघनाचं पहिलंच अर्धशतक

मूळची आंध्र प्रदेशची शब्बीनेनी मेघना आज भारताकडून सलामीला उतरली. तिनं मलेशियाविरुद्द केलेली 69 धावांची खेळी ही तिच्या आजवरच्या टी20 कारकीर्दीतली सर्वोत्तम खेळी ठरली. याआधी मेघनानं 12 टी20 सामन्यांमध्ये 144 धावा केल्या होत्या. त्यात 37 ही तिची सर्वोच्च धावसंख्या होती.

हेही वाचा - Legends Cricket T20: भर मैदानात दोन दिग्गज खेळाडूंची एकमेकांना धक्काबुक्की, Video Viral

शफाली पुन्हा फॉर्ममध्ये

गेल्या काही सामन्यात भारताची सलामीवीर शफाली वर्मानं क्रिकेट चाहत्यांना निराश केलं होतं. इंग्लंड दौऱ्यात ती फारसा प्रभाव पाडू शकली नाही. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या आशिया चषकातल्या पहिल्या सामन्यातही शफाली अवघ्या 10 धावा काढून बाद झाली. पण मलेशियाविरुद्ध मात्र शफाली आत्मविश्वासानं खेळली. तिनं आपल्या 46 धावांच्या खेळीत 1 फोर आणि 3 सिक्स लगावले.

पावसाचा व्यत्यय, टीम इंडियाचा विजय

दरम्यान भारत आणि मलेशिया सामन्यात पावसानं व्यत्यय आणला. दिप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाडच्या फिरकीसमोर मलेशियाची 5.2 ओव्हरमध्ये 2 बाद 16 अशी अवस्था झाली होती. त्याचवेळी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला. पण त्यानंतर खेळ सुरु करण्यासारखी परिस्थिती नसल्यानं अम्पायर्सनी डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे भारताला 30 धावांनी विजयी घोषित केलं.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sports, Team india, Women's cricket Asia Cup